‘या’ मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीर मधील गावात पहिल्यांदाच पोहोचवली वीज

वृत्तसंस्था |  स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षाच्या जवळपास काळ होत आला पण, काही भाग अतिशय साध्या गोष्टींसाठी लढताना आणि वाट पाहताना दिसून येतो. अजूनही देशाच्या अनेक भागात वीज पोहचलेली नाही. जम्मू – काश्मीर मधील गणोरी – तंटा या गावीही वीज पोहचली नव्हती. ती वीज इतक्या काळानंतर आज या गावात पोहच झाली. आणि या वीज पोहचण्याला मराठमोळे आयएएस अधिकारी आणि दोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सागर डोईफोडे यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी निर्णय घेऊन दहा दिवसात तारा ओढण्याचे काम पूर्ण करून गावात वीज पोहचवली.

जम्मू – काश्मीर मधील दोडा जिल्ह्यातील गानोरी – तंटा या गावात आज वीज पोहचली आहे. नागरिकांनी खूप आनंद व्यक्त केला असून आज खऱ्या विकासाची सुरवात झाली असून, आज खरे आमचे वर्तमान प्रकाशमान झाले. असे नागरिक म्हणाले. तर, ‘स्वातंत्र्यापासून नव्हे तर मानव इतिहासापासून गणोरी – तंटा येथील लोकांना आज वीज मिळाली आहे’. असे जिल्हाधिकारी सागर डोईफोडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like