VIDEO: चक्क लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा सचिनने लुटला मनमुराद आनंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पाऊस म्हटलं, की अनेक आठवणी ओघाओघानं आल्याच. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. सध्याच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाचं थैमान सुरु असताना हा सचिनही आपल्या कुटुंबासमवेत आपल्याच घरी काही क्षण व्यतीत करत आहे. अशाच क्षणांमध्ये त्यानं वरुणराजाचंही स्वागत केलं आहे. सचिननं इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये एखाद्या लहान मुलाप्रमाणे सचिन पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत आहे.

पावसाच्या सरी बरसत असताना ज्याप्रमाणे अतिशय कुतूहलानं एखादं लहान मुल त्याचा प्रत्येक थेंब आपल्या अंगावर झेलतं त्याचप्रमाणे सचिनही पावसाचा प्रत्येक थेंब आपल्या अंगावर झेलत त्याच पावसाच्या साचलेल्या पाण्यातही कुतूहलानं खेळताना आणि निसर्गाच्या या किमयेला पाहताना दिसत आहे. सचिनला असं पावसात खेळतांना त्यांच्या मुलगी साराने आपल्या कॅमेरात टिपलं आहे.

https://www.instagram.com/p/CCqbNNXgtRh/?utm_source=ig_web_copy_link

सारा सचिनच्या कॅमेरावुमनच्या रुपात तिची भूमिका बजावताना यावेळी दिसली. सचिननेच याबाबत त्याच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. क्रिकेट विश्वात रमणाऱ्या मास्टर ब्लास्टरच्या जीवनातील या क्षणांना पाहून सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्सनीही त्यांच्या पावसाळ्यातील आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.