१२ ऑगस्ट पर्यंत कोणती ट्रेन रद्द आणि कसा मिळणार रिफंड? जाणुन घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या घटना लक्षात घेता सर्व सामान्य रेल्वे सेवा या 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. गुरुवारी भारतीय रेल्वेकडून याबाबत आदेश देण्यात आला. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसह सर्व सामान्य प्रवासी सेवा गाड्या आता 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. या नवीन ऑर्डरवरून हे स्पष्ट झाले आहे की 12 ऑगस्टपर्यंत आता फक्त विशेष गाड्याच सुरु राहतील.

कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता रेल्वेने घेतलेल्या या निर्णयानंतर प्रवाशांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. तिकिट रद्द करणे, रिफंड, कोणत्या गाड्या धावतील आणि कोणत्या धावणार नाहीत, असे अनेक प्रश्न सध्या आहेत.चाल तर मग आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेउयात.

12 ऑगस्टपर्यंत रेल्वे चालवण्यास मनाई करणाऱ्या रेल्वेने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार सर्व सामान्य रेल्वे सेवांवर 12 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे यादरम्यान कोणतीही मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन, लोकल ट्रेन आणि ईएमयू गाड्या चालवल्या जाणार नाहीत.

यावेळी कोणत्या गाड्यांनी प्रवास करता येईल ?
रेल्वेकडून असे सांगण्यात आले आहे की, यावेळी फक्त विशेष गाड्याच चालविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. लॉकडाऊन दरम्यान, 12 मे रोजी रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसच्या 15 जोड्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून त्या अजूनही सुरू आहेत. या व्यतिरिक्त 1 जूनपासून 100 जोड्या मेल / एक्स्प्रेस गाड्या सुरू राहतील.

तिकिटाचे रिफंड कसे परत मिळणार ?
तिकिट रद्द करण्याबाबतचे आदेश यापूर्वीच जारी करण्यात आलेले आहेत, सामान्य टाइम टेबलनुसार 30 जून, 2020 पर्यंतची सर्व तिकिटांचे रीफंड दिले जातील. त्याच बरोबर, 01-07-2020 ते 12-08-2020 पर्यंतची सर्व तिकिटे रद्द केली जातील आणि ऑर्डरनुसार त्यांची सर्व रक्कम परत केली जाईल.

विशेष गाड्यांबाबत काय आदेश आहे ?
रेल्वेकडून असे म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता, सर्व सामान्य रेल्वे सेवा 12 ऑगस्टपर्यंत थांबविल्या जातील, त्या दरम्यान विशेष गाड्या या पूर्वीप्रमाणेच चालवल्या जातील.

रेल्वेने आपली मुदत वाढविली आहे
काल रेल्वेने जारी केलेल्या आदेशापूर्वी सर्व रेल्वे स्थानकं ही 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती, आता ती 12 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एखाद्याने 30 जूनपर्यंत तिकीट काढले असेल तर त्याला फुल रीफंड मिळेल.

कोविड-19मुळे लॉकडाऊन झाल्यामुळे देशातील विविध भागात अडकलेल्या लोकांना घरी पोहोचता यावे यासाठी 12 मेपासून राजधानीच्या 15 जोड्या सुरू करण्यात आल्या. या गाड्या राज्य राजधानी किंवा मोठ्या स्टेशनसाठी सुरु करण्यात आल्या. यानंतर, रेल्वेने अन्य प्रवाशांच्या सोयीसाठी 1 जूनपासून नॉन-एसी गाड्यांच्या 100 जोड्या धावण्यास सुरुवात केली होती ज्याला आता रेल्वेने 12 ऑगस्टपर्यंत थांबवण्याचे ठरवले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment