मुंबई। जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आणि राज्यातही कोरोना रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. मुंबई शहर देशातील सर्वात मोठे कोरोना हाॅटस्पाॅट बनले आहे. ठाकरे सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरवातीपासूनच नियोजनबद्ध काम करत आहे. सरकारच्या याच प्रयत्नांना आता मिळत असून धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाला आळा घालण्यात सरकार यशस्वी झाले आहे. यापार्श्वभुमीवर चीन मधील वुहान बरोबर गणल्या जाणाऱ्या मुंबई मधील धारावी मॉडेल चे कौतुक WHO कडून होत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून मुंबईतील धारावी झोपट्टीला ओळखले जाते. धारावीची झोपडपट्टी ही 2.5 चौरस किलोमीटर मध्ये पसरली आहे. त्यामध्ये साधारण 6.5 लाख इतकी लोकसंख्या राहते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी धारावी मॉडेल चे कौतुक करत भारत आणि भारतीय प्रशासन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. जगात अनेक वेळा जागतिक महामारी येऊन गेली आहे. अनेक गंभीर आजाराला सुद्धा नियंत्रणात केले जाऊ शकते, केवळ राष्ट्रीय ऐक्य आणि जागतिक एकात्मता यांची सांगड घालून अश्या महामारीला आटोक्यात आणले जाऊ शकते. मुंबई मधील धारावीची लोकसंख्या जास्त आहे. मात्र तरीही सरकारच्या प्रयत्नांमुळे तिथे कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. असं म्हणत WHO ने ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. या ठिकाणी कमी क्षेत्रात जास्त लोक राहतात. अशा ठिकाणावरून रुग्ण शोधणे , त्यांच्या चाचण्या करणे, त्यांचे विलगी करण करणे, सोशल अंतर राखणे आणि कोरोनाची साखळी तोडणे हे अगदी क्लिष्ट काम आहे. आणि संसर्गाची साखळी तोडत त्यावर ताबा मिळवणे हे खूप महत्त्वाचे आहे. असं यावेळी ते म्हणाले.
सुरुवातीला धारावी परिसरात कोरोनाचा प्रभाव खूप वाढला होता. त्यातूनच अनेक तर्क वितर्क पण लावले गेले होते. त्यानंतर प्रशासनाने योग्य ती काळजी घेत धारावी मध्ये आयसोलेशनची व्यवस्था केली. सामूहिक शौचालय असल्याने त्याची पण व्यवस्था करण्यात आली. तसेच कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण ही वाढवण्यात आले. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आले. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये रुगण्यासंख्या वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत7 हजार 862 रुग्ण सापडले असून 226 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.