हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात?’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. लोक उपयुक्त योजना रद्द करुन जनतेच्या विकासात अडथळा आणू नये. भाजपा सरकारमध्ये जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात एकाही टॅंकरची गरज भासली नाही.’ असाही टोमणा मारला.
मुंबईतील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या लपविलेल्या गोष्टीचाही त्यांनी उल्लेख केला ते म्हणाले, ‘राज्यातील कोरोनामुळे झालेला मृत्यूचा आकडा लपवला जात आहे. रुग्णालयांमधून शव गायब होत आहेत.’ तसेच आम्ही कोथरुड मध्ये रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सुमारे १०५० रक्ताच्या बॉटल्स जमा केल्या आहेत ज्याचा उपयोग या काळात होऊ शकणार आहे असेही सांगितले. या मुलाखतीत सरकारवर टीका करत असतानाच भाजपाने सुरु केलेल्या उपक्रमांची माहिती देत त्यांनी नाणारप्रकल्पामुळे कोकणवासियांचा मोठा फायदा होईल. साधारण २० हजार कोटींचा महसूल जमा होईल. असेही मत मांडले.
पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर ४० लाख लोकांना १० दिवस पुरेल इतक्या किराणा साहित्याचे वाटप केले आहे तसेच कोल्हापुरात ७५ हजार घरांमध्ये रोज तीन पोळ्या आणि भाजी पाठवण्याचा उपक्रम सुरूआहे. अशीही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना एक महिन्याचा जॉब आणि पाच हजार रुपये अधिक देण्याचा मी निर्णय घेतला आहे. असेही सांगितले.
कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात? हा प्रश्न आहे. pic.twitter.com/Uz3aq0mJOK
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 19, 2020
कोकणातील स्थितीविषयी बोलताना कोकणात अनेक प्रकल्प आल्यावर लोकांना नोक-या मिळतील. असे त्यांनी सांगितले आणि नाणार प्रकल्प कोकणात आल्यास कोकणवासियांसाठी मोठा रोजगार उपलब्ध होईल. प्रकल्प कोकणातच आला पाहिजे, पर्यावरणावर नक्की विचार करु आणि तोडगा काढू. अशी भूमिका मांडली. तसेच कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले असल्याचे आणि त्या नुकसानातून सावरण्यासाठी सहा हजार सोलार कंदील, कौले, पत्रे आणि ताडपत्री वितरित केले असल्याचे सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.