क्वारंटाईन मध्ये असलेल्या व्यक्तीच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील ४० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बामणोली येथील दादासो अण्णा फोंडे यांच्यासह कुटुंबियांना संस्था कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. घर बंद असल्याचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यानी बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्या सह रोक रक्कम ३३ हजार असा एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केली आहे. याची फिर्याद बामणोलीचे पोलीस पाटील शिवाजी कल्लाप्पा चिनमुरे यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीसात दिली आहे.

दादासो फोंडे यांना कुटूंबा सहित 30 एप्रिल रोजी संस्था कॉरंटाईन करण्यात आले आहे. फोंडे यांच्या घरामध्ये मुंबईवरून त्याची बहीण भाऊजी आणि दोन भाचे आले होते. त्या मधील त्याची बहीण भाऊजी आणि त्यांच्या नात्यातील वाघमोडेनगर मधील 17 वर्षीय मुलीस कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने फोंडे यांच्या कुटुंबाला संस्था कॉरंटाईन करण्यात आले आहे. घराला कुलूप घालून फोंडे यांनी घर सोडले होते. बंद घर आहे याचा फायदा उचलत काही अज्ञात चोरट्यानी पाळत ठेवली होती.

दिनांक 30 एप्रिल रात्री 10 वाजल्या पासून ते 6 मे संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर फोडी करून मुद्देमाल लंपास केला आहे. याचा उलघडा बुधवार संध्याकाळी झाला. फोंडे यांच्या घराच्या काडीला टॉवेल गुंडाळलेला शेजाऱ्याला दिसला. घरात कुणीही नसताना हा टॉवेल आला कसा याच्या संशयाने शेजाऱ्यांनी फोंडे यांना फोन वरून हकीकत सांगितली. त्याच बरोबर बामणोलीचे पोलीस पाटील शिवाजी चिनमुरे यांना बोलावून घेतले. माहिती मिळताच पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. काडीला लावलेला टॉवेल काढला असता घराला कुलुप न्हवते.

बाहेच्या घरातील लोखंडी कपाट आणि स्वयंपाक खोलीतील लाकडी कपाट उघडलेले आणि अस्ताव्यस्त झाले होते. फोंडे यांना व्हिडीओ कॉलिंग करून हकीकत दाखवली असता बाहेच्या कपाटातील रोख रक्कम 33 हजार रुपये आणि स्वयंपाक खोलीतील लाकडी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 63 हजारांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केल्याचे निदर्शनास आले. याची फिर्याद पोलीस पाटील शिवाजी चिनमुरे यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here