हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या देशभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संचारबंदी सुरु आहे. नियम शिथिल केले असले तरी पूर्णतः सर्व कामकाजाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे व्यवसाय पूर्णतः सुरु झालेले नाहीत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. सामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरी भागात राहणाऱ्या तसेच छोटीमोठी कामे करणाऱ्या कामगारांना काम नसल्याने सध्या या लोकांचे हाल सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मनरेगा सारख्या योजना शहरी भागात राबविण्याची मागणी केली होती. त्यांनी पुन्हा अशी मागणी करणारे ट्विट केले आहे.
‘शहरी भागात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढतंय. परिणामी हेल्पर, ड्रायव्हर यासारखं काम करणाऱ्या शेकडो कामगारांचं मासिक उत्पन्न पूर्णत: ठप्प झालंय. त्यामुळं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की, बेरोजगारी कमी करण्यासाठी मनरेगा सारखी एखादी योजना शहरातही लागू करावी.’ असे ट्विट त्यांनी केले आहे. याआधीही त्यांनी ट्विट करून पंतप्रधानांना अशी विनंती केली होती.
शहरी भागात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढतंय. परिणामी हेल्पर, ड्रायव्हर यासारखं काम करणाऱ्या शेकडो कामगारांचं मासिक उत्पन्न पूर्णत: ठप्प झालंय. त्यामुळं @PMOIndia ला माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की, बेरोजगारी कमी करण्यासाठी #मनरेगा सारखी एखादी योजना शहरातही लागू करावी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 3, 2020
दरम्यान राज्यभरात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी संक्रमणाच्या धोक्यापासून अजून सुटका झालेली नाही. त्यामुळे राज्यातील कामकाज सुरळीत सुरु झालेले नाही आहे. राज्यातील लोकांचे रोजगार गेले आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.