नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आदेशानंतर देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या बँकिंगच्या फसवणूकी पासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत. SBI नंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना बँकिंगच्या घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही महिन्यांत बँकिंग घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. अशा परिस्थितीत बँकेकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत सरकारने याआधीही ऍडव्हायजरी काढून सामान्य लोकांना आणि संस्थांना मोठा सायबर हल्ला होण्याच्या शक्यतेविषयी इशारा दिला होता.
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या अलर्ट्सचा उल्लेख केला आहे. तसेच ऑनलाइन शॉपिंग घोटाळा टाळण्यासाठी एक ट्विटही जारी केलेला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, एका लहान चुकीमुळे आपले संपूर्ण खाते रिकामे होऊ शकते. अशी फसवणूक टाळण्यासाठी बँकेने काही उपायही सांगितलेला आहे.
आपला शॉपिंग घोटाळा टाळण्यासाठी या तीन स्टेप्सला फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे: –
> कोणत्याही शॉपिंग वेबसाइटचे आकर्षक डील पहा, वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करताना सावध रहा.
> शॉपिंग वेबसाइट्सचे नाव काळजीपूर्वक पहा. असे वाटत असेल की, ही दुसर्या वेबसाइटची कॉपी आहे तर ती उघडू नका.
> अनेक वेळा फोनवर शॉपिंग वेबसाईटच्या जाहिराती येताच ग्राहकांना अशा ब्राउझर पासूनही सावध राहण्याची गरज असते.
यापूर्वीही बँकेने अलर्ट जारी करून ग्राहकांना बनावट कॉलबाबत सतर्क राहण्यास सांगितले. वास्तविक, काही लोकं स्वत: ला बँक कर्मचारी असल्याचे सांगतात आणि ग्राहकांना फसवण्यासाठी फेक कॉल करतात. त्यांनतर फोनवर, ग्राहकांना बँक खाते बंद होणार असल्याची भीती दाखवून त्यांच्याकडून माहिती मिळवतात आणि त्यांच्या खात्यातून पैसे गायब करतात. अशा परिस्थितीत PNB ने बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही फसवणूकीत अडकू नये, असा इशारा दिला आहे.
बँक फ्रॉड कसे टाळावे
1-OTP, PIN, CVV, UPI PIN पिन शेअर करू नका.
2- बँक खात्यातून पैसे काढले गेले तर काय करावे
3- कधीही बँकिंग माहिती फोनमध्ये सेव्ह करू नका
4- ATM कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती शेअर करू नका
5- बँक कधीही कोणतीही माहिती विचारत नाही
6- ऑनलाईन पेमेंट मध्ये सावधगिरी
7-तपासणी न करता सॉफ्टवेअर इंस्टॉल करू नका
8- अज्ञात लिंक तपासा
9 – स्पायवेअर पासून सावध रहा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.