मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येनंतर सातत्याने घराणेशाही आणि एकाधिकारशाही याविरुद्ध अनेकांनी आवाज उठवला आहे. या मुद्द्यांवर आता प्रसिद्ध निवेदक आणि अभिनेता अन्नू कपूर यांनी मत मांडले आहे. ते म्हणाले जर घराणेशाही खरंच मनोरंजन क्षेत्रात काम करत असती तर सनी देओल, अमिताभ बच्चन, वाशु भगनानी, हॅरी बवेजा सारख्या मोठ्या कलाकारांची मुले टॉम क्रूज बनले असते. सोशल मीडियावर करण जोहर, सलमान खान, महेश भट्ट आणि भूषण कुमार या लोकांना दोषी ठरविले जात असताना अन्नू कपूर यांनी हे मत मांडले आहे. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान कुणाच्याही आधाराशिवाय सुपरस्टार बनले आहेत असा दावा त्यांनी केला आहे.
सध्या शेखर सुमन, कंगना रनौत सारख्या कलाकारांनी सुशांतच्या मृत्यूसंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे एका मुलाखतीत अन्नू कपूर यांनी घराणेशाही सारखी कोणती गोष्टच नसते असे म्हंटले आहे. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कुणाच्याही आधाराशिवाय आपले नाव केले आहे. असे ते म्हणाले. एखाद्या मोठ्या कुटुंबात जन्माला येण्याने काही होत नाही. त्यासाठी कला देखील असावी लागते असे त्यांचे म्हणणे आहे.
एखाद्या आर्किटेक्टचा मुलगा आर्किटेक्ट होऊ शकतो, डॉक्टर चा मुलगा डॉक्टर होऊ शकतो पण एखाद्या अभिनेत्याचा मुलगा अभिनेता झाला तर घराणेशाहीची बडबड सुरु होते. आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी करत असतात त्यांना सल्ला देत असतात. ते असे करून आपले कर्तव्यच निभावत असतात. तर मग यात चुकीचे काय आहे असे अन्नू कपूर यांनी म्हंटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.