आंदोलन करणारे शेतकरी खरंच भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत? संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । यावेळी देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन चांगलेच चर्चेत आलेले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, आंदोलन करणारे शेतकरी भारतीय ध्वजाचा अवमान करीत आहेत … हा फोटो खरा आहे की बनावट याचा तपास केला गेला आहे. पीआयबी फॅक्ट चेक ने याबाबत एक ट्विट करुन या फोटोविषयी माहिती दिलेली आहे.

PIB या भारत सरकारच्या संस्थेने या व्हायरल मेसेजमागचे सत्य स्वतंत्रपणे उघड केले आहे. चला तर मग या बातमीत किती सत्य आहे ते जाणून घेऊयात…

दावाः प्रदर्शन करणारे शेतकरी भारतीय ध्वजाचा अवमान करीत असल्याचा दावा करून सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर केले जात आहे.

सत्य काय आहे ते जाणून घ्या
PIBFactCheck ने केलेल्या तपासणीनंतर हे छायाचित्र जुने असल्याचे समोर आले आहे. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी त्याचा काहीही संबंध नाही आहे.

या व्हायरल फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला 2019 चा एक ट्विट मिळाले, ज्यामध्ये हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. दल खालसा यू.के. 15 ऑगस्ट 2013 चा लोगो आणि डेट स्टॅम्प जोडलेला आहे. हे स्पष्ट आहे की, हा फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा असू शकत नाही.

यापूर्वीही ही बातमी व्हायरल होत होती
यापूर्वीही एका दुसर्‍या बातमीत असा दावा केला जात होता की, 1 डिसेंबरपासून पुन्हा एकदा देशातील सर्व गाड्या थांबविण्यात येतील. व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर याबाबत एक मेसेज व्हायरल होत होता. या मेसेजमध्ये असेही म्हटले गेले आहे की, कोरोना कालावधीत सरकारने जाहीर केलेल्या स्पेशल गाड्यादेखील बंद केल्या जातील. पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावाही खोटा निघाला होता.

कोरोना युगात अशा बनावट बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत
कोरोना युगात, देशभरात ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यामध्ये अशा अनेक बनावट बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने या व्हायरल बातमीचा इन्कार करत म्हटले आहे की, सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोना कालावधीत अशा बनावट बातम्यांचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारनेही अनेक प्रयत्न केले आहेत.

https://t.co/ujYokPO1vs?amp=1

आपल्याला मेसेज मिळाल्यास इथे तपासू शकता
आपल्यालाही असा मेसेज मिळाला असल्यास आपण https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः [email protected] वर फॅक्ट चेकसाठी पीआयबीला पाठवू शकता. ही माहिती पीआयबी वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

https://t.co/dCuhFrLS55?amp=1

https://t.co/XvDkAKwanK?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.