‘यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार’; ‘ऑनलाईन’ मेळाव्याच्या चर्चेला संजय राऊतांचा फुलस्टॉप

मुंबई । कोरोनामुळे यंदाच्या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर परिणाम झाला असून अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्यावरही यंदा कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या चर्चांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम … Read more

वनविभागाचा पराक्रम! नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी चक्क कर्मचाऱ्यालाचं बसवलं पिंजऱ्यात

चंद्रपूर । एखाद्या नरभक्षक वाघला किंवा बिबट्याला एक तर बेशुद्ध करून पकडले जाते वा पिंजऱ्यात बकरीचे आमिष दाखवून जेरबंद केले जाते. मात्र, राजुरा तालुक्यात १० जणांचे बळी घेणारा आर टी -१ वाघ या प्रयोगाला जुमानत नसल्याने वनविभागाने एक जीवघेणी शक्कल लढवली आहे. वनविभागाने बकरीऐवजी विभागातील कर्मचाऱ्यांनाच चक्क पिंजऱ्यात बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजुरा … Read more

कोरोनाला रोखण्यासाठी ‘हा’ उपाय ठरू शकतो जीवघेणा; WHO सह ८० वैज्ञानिकांनी दिला गंभीर इशारा

जिनेव्हा । जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातलं आहे. या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी हर्ड इम्यूनिटी तयार व्हायला हवी असं मत अनेक वैज्ञानिकांनी व्यक्त केलं होतं. हर्ड इम्यूनिटी म्हणजेच लोकसंख्येचा मोठा भाग हा कोरोनाने संक्रमित व्हायला हवा. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत धोक्याची सुचना दिली होती. याशिवाय जगभरातील ८० वैज्ञानिकांनी, तज्ज्ञांनी हर्ड इम्यूनिटीचा अवलंब जीवघेणा ठरू शकत … Read more

कोरोना काळात सायकल आले ‘अच्छे दिन!’ विक्रीमध्ये लक्षणीय वाढ; खरेदीसाठी ग्राहक ‘वेटिंग’वर

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आपल्या आरोग्याविषयी फारच जागरूक झाल्याने सायकलची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. देशात प्रथमच मोठ्या प्रमाणावर सायकलची मागणी नोंदवण्यात आली आहे.सायकल निर्मात्यांची राष्ट्रीय संघटना असणाऱ्या ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार (एआयसीएमए) मे महिन्यापासून सप्टेंबर २०२०पर्यंतच्या पाच महिन्यांत देशात एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झाली आहे. … Read more

घर घेण्याच्या विचारात आहात? तर ‘या’ बँकेकडून होम लोनवरील व्याज दरात मोठी कपात

मुंबई । घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कोटक महिंद्रा या खासगी बँकेने होम लोनच्या व्याजावर मोठी कपात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने 7 टक्क्याने होम लोन देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोटक महिंद्राचा हा होम लोन दर भारतीय स्टेट बँकेच्या होम लोन दरा एवढाच झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला … Read more

फडणवीसांनंतर आता अजित पवार चौकशीच्या फेऱ्यात? ईडी करणार सिंचन घोटाळ्याचा नव्याने तपास

मुंबई । राज्य सरकारने एकीकडे जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेटाळा आहे. त्यामुळं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आले असतानाच दुसरीकडे सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) आता सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले उपमुख्यमंत्री अजित … Read more

‘उद्धवजी अतिवृष्टी झालेल्या भागांचा किमान प्रत्यक्ष दौरा करा, लोकांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर

मुंबई । मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाआहे. वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. … Read more

दुर्दैवी घटना ! बुडणाऱ्या भाच्यांना वाचवताना मामाचाही बुडून मृत्यू

Drawned

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे वाण नदीच्या पात्रातील पाणीच्या डोहामध्ये बुडणाऱ्या भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा हि बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडली आहे. यात दोन सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सोनपेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे. सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील एक महिला दसरा सणानिमित्त कपडे धुण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी … Read more

‘उद्धवजी राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा!’ देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई । महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या संबंधित भागातील शेतक-यांना तातडीने मदत करा तसंच ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतक-यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. फडणवीसांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.“परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड … Read more

कॉर्पोरेट कंपन्यांच्या देणग्यांनी भाजप मालामाल; इतर राजकीय पक्षांपेक्षा मिळाली ७ पटींनी अधिक देणगी

नवी दिल्ली । गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत कॉर्पोरेट कंपन्यांकडून सर्वाधिक देणगी भारतीय जनता पक्षाला मिळाला असल्याचे असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) एका ताज्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. इतर पक्षांना मिळालेल्या देणगीची बेरीज केली, तरी देखील भारतीय जनता पक्षाला मिळालेला निधी हा ७ पटीने अधिक असल्याचे ADRच्या अहवालात समोर आलं आहे. सन २०१८ ते २०१९ मध्ये … Read more