‘मी नाही बाप काढला, मी सहज बोललो होतो, त्यावर इतकं अंगावर येऊ नका हो!’; चंद्रकांतदादांची सारवासारव

मुंबई । पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना ”आम्ही तुमचे बाप आहोत” असे म्हणाले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढण्याची भाषा सारखी करत आहात” असा प्रतिहल्ला चढवला … Read more

‘भुजबळ साहेबांनी धीर दिला म्हणून, मी व्हीलचेअरवर असतानाही अर्थसंकल्प मांडू शकलो’; जयंत पाटलांचा आठवणींना उजाळा

मुंबई । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षातील दिग्गज नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जयंत पाटलांनी आपल्याला झालेल्या अपघातावेळी भुजबळांनी केलेली मदत यानिमित्ताने सांगितली. छगन भुजबळांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी अर्थसंकल्प तयार केला, व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही, अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर … Read more

‘जलयुक्त शिवार’ योजनेतील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

मुंबई । ‘जलयुक्त शिवाराचं काम पूर्ण होण्यासाठी मोठा जनसहभाग होता. गावागावात कामे झाली. आता या जनसहभागाचीही चौकशी करणार का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant Patil on Jalyukt shivar scheme SIT probe) ‘सरकार तुमचं आहे. तुम्ही दोषींवर कारवाई करू शकता. पण वस्तुस्थिती काय आहे हे पाहा, असंही पाटील यांनी म्हटलं. राज्य मंत्रिमंडळाच्या … Read more

अस्मानी संकटाचा कहर! मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेती पाण्याखाली; शेतकरी हवालदिल

औरंगाबाद । कोरड्या दुष्काळामुळं गेली काही वर्ष होरपळून निघालेल्या मराठवाड्यावर आता ओल्या दुष्काळाने थैमान घातलं आहे. राज्यासह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने चांगलाचं झोडपलं आहे. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. या अस्मानी संकटामुळं हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून … Read more

खडसेंच्या बालेकिल्ल्यात वाजतोय घड्याळाचा गजर; राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सोशल मीडियावर फिरते ‘ही’ पोस्ट

जळगाव । आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हणत पक्ष नैतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. येत्या 17 तारखेला  म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करून आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे वारे वाहायला सुरुवात झाली … Read more

योजनेमुळं ‘शिवार’ खरचं जलयुक्त झाले की, फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले? रोहित पवारांचा भाजपला टोला

मुंबई । जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही भाजपाच्या यशस्वी योजनांमधली एक समजली जात होती. पण आता तीच योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. या योजनेमुळे ‘शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच … Read more

पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर पाण्याचा मोठा विसर्ग; पहा व्हिडिओ

Dagdusheth Ganpati

पुणे प्रतिनिधी | पुण्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात रस्त्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Ganpati) गणपतीसमोरील रस्त्यावरही पाण्याचा मोठा विसर्ग चालू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. #WATCH: Heavy … Read more

पुणेकरांची झोप उडाली! शहरात सर्वत्र पाणीचपाणी; सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. Pune: Water logging in parts of Indapur … Read more

पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

पुणे प्रतिनिधी | पुणे शहर आणि परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. Pune: Water … Read more

अतिवृष्टीनंतर आता कडाक्याची थंडी; हवामान खात्याचा अंदाज

Winter

नवी दिल्ली । यंदाचं वर्ष कोरोना महामारी, अतिवृष्टी यांनी गाजवलं असताना आता हिवाळ्यात थंडीही अधिक कडाक्याची राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. सप्टेंबर, ऑक्टॉबर महिन्यात उष्णता जाणवत असली तरी इथून पुढे थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदाचा हिवाळा हा यापूर्वीच्या हिवाळ्यांपेक्षा अधिक थंड असू शकतो. ‘नीना कंडिशन’ मुळे यावर्षी अधिक … Read more