कर्नाटकने रोखला ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजनचा पुरवठा; केंद्राची हस्तक्षेपाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वाढत्या संख्येला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आवश्यक आहे. केंद्राकडून प्रत्येक राज्याला ऑक्सिजनच्या टँकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑक्सिजनच्या अभावी अनेकांनी आपले प्राण गमावल्याची घटना देखील आपण पाहिल्या आहेत. मात्र आता कर्नाटकातून कोल्हापूर, सांगली, सातारा याबरोबरच सहा जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजनचा … Read more

आमदार असावा तर असा ! थाट माट सोडून सामान्यांत मिसळणारा…फोटो होतोय व्हायरल

nilesh lanke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत माणुसकीच्या नात्यानं काही सेवाभावी संस्था कोविड रुग्णांच्या मदतीला धावून येत आहेत. पण एका आमदाराचा फोटो पाहून मात्र तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या आमदारांना कोरोना रुग्णांची पूर्णपणे काळजी घेता यावी म्हणून कोबिर सेंटरमध्ये त्यांनी आपला मुक्काम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांचे नाव … Read more

अनिल देशमुखांना मुंबई HC चा झटका; आव्हानात्मक याचिका फेटाळली

anil deshmukh

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या एफआयआरला आव्हान देणारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. अनिल देशमुखांना हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. आवश्यक असल्यास त्याच्या खटल्याची निकड लक्षात घेऊन अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या सुट्टीतील खंडपीठ स्थानांतरित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या एफआयआरला आव्हान देणारी महाराष्ट्राचे … Read more

पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी चौकशीसाठी केंद्राने गठित केली समिती

amit shah mamata banarjee

नवी दिल्ली वृत्तसंस्था: दोन मे रोजी पश्चिम बंगाल निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यानंतर मात्र पश्‍चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आलं. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारप्रकरणी आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने या चौकशीसाठी एक समिती गठीत केली आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी … Read more

‘अशोक चव्हाण यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये’ मराठा आरक्षण प्रकरणी विनायक मेटेंचा घणाघात

ashok chavhan & vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याची घोषणा बुधवारी केली. यामुळे राज्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान मराठा आरक्षण रद्द केल्याचा खापर आमदार विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर फोडले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांनी एक मिनिट सुद्धा पदावर राहू नये अशा कठोर शब्दात विनायक मेटे यांनी टीका … Read more

देशात मागील 24 तासात नव्या 4,12,262रुग्णांची नोंद तर 3,29,113 जण कोरोनामुक्त

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. अशा परिस्थितीत देश आणि राज्य स्तरावर देखील विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जात आहेत. मात्र मागील २/३ दिवसांपासून कमी होत असलेल्या आकडेवारीत आता पुन्हा वाढ झाली आहे. मागील 24 तासात देशात 4,12,262 नवे करोना बाधित रुग्ण … Read more

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरींचे कोरोनामुळे निधन, PM मोदींनी व्यक्त केले दुःख

ajit singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. अशातच कोरोनामुळे देशातील अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे (Rld )अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी … Read more

मराठा आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस आणि भाजपचं पाठबळ ; मंत्री नवाब मलिक यांचा हल्लाबोल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयानंतर मात्र विरोधक आणि सत्तेतील महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं पाठबळ दिले असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक … Read more

मराठा आरक्षणाबाबत तातडीचा निर्णय घ्या ! PM मोदींना मुख्यमंत्र्यांची हात जोडून विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यामुळे अनेक स्तरांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे इतकेच नव्हे तर विरोधकांकडून हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका देखील करण्यात येत आहे. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात तातडीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र … Read more

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ? मुलांच्या अर्धा डझन कंपन्या CBI च्या रडारवर

नवी दिल्ली वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करत असताना एक नवीन खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार , या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयला देशमुखांच्या मुलांच्या अर्धा डझन कंपन्यांची माहिती मिळाली आहे..देशमुख यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केले … Read more