हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बर्याच कलाकारांच्या संघर्षांची गोष्ट ऐकली असेल. त्याच वेळी प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयनेही हा प्रवास आपल्या इतका सोपा नव्हता असे म्हंटलेले आहे. आपल्या कारकीर्दीत त्यानेही अनेक अडचणींचा सामना केलेला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रोनित रॉयने बॉलिवूड मधल्या आपल्या स्ट्रगलची स्टोरी सांगितली आहे, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रोनित रॉयने ज्या काळात त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते त्या काळाविषयी सांगितले आणि तो कसा नैराश्यात गेला याविषयी सांगितले. आयुष्याच्या अशा काळात एका वाईट गोष्टीची सवय लावून त्याने आपला त्रास आणखीच वाढवला होता, मात्र त्यातून तो कसा बाहेर पडला हे देखील त्याने यावेळी सांगितले.
बॉलिवूड इंडस्ट्रीच्या त्या सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत रोनित रॉयचा समावेश होतो ज्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, पण एक काळ असा होता की त्याच्या आयुष्यात नैराश्य, व्यसनाची गडद छाया होती. हिंदुस्तान टाईम्सच्या एका वृत्तानुसार, रोनित रॉयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तो म्हणाला की, “असा एक काळ होता जेव्हा मी नैराश्यात होतो आणि खूपच मद्यपान करण्यास सुरुवात केली होतो.” १९९२ मध्ये त्याचा ‘जन तेरे नाम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. मात्र असे असूनही त्याच्याकडे कोणतेही काम येत नव्हते.
या मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘मी इतका निराश झालेलो होतो की माझ्याकडे जी ऑफर येत होती, कोणताही विचार न करताच मी ती घेत असे. परिणाम असा झाला की त्यातले बरेच चित्रपट बनलेच नाहीत आणि जे बनले ते चालले नाहीत. त्यामुळे मी नैराश्यात गेलो आणि दारू पिण्यास सुरुवात केली. मात्र , रोनितने स्वत: ला या औदासिन्यत्याच्या आणि व्यसनाच्या जाळ्यातून स्वतःला बाहेर काढले आणि आज यामुळेच त्याचे चाहते त्याचे कौतुक करतात.
रोनित म्हणाला की, ‘पुढच्या काही वर्षांतच मी स्वत: ला स्थिर केले. मला एक स्टार व्हायचे होते. जेव्हा मी पडद्यावर अयशस्वी होऊ लागलो तेव्हा मला समजले की मी स्टार नाही, मात्र आता मला अभिनेता होण्यावर भर देण्याची गरज आहे. राजेश खन्नाच्या फॅन फॉलोव्हिंगमुळे तो खूप प्रेरित असल्याचेही रोनितने यावेळी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.