पुणे | करोनाच्या काळामध्ये आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. खूप लोकांना उपासमार सहन करावी लागली. काही लोक डिप्रेशनमध्ये गेले. तर काहींनी या संकटाच्या काळामध्ये संधी हेरून आपले व्यवसाय सुरू केले. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये उलाढालही करणे सुरू केले आहे. अशाच पुण्यातील एक महिला, ज्यांनी साडेतीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. आणि आता त्या व्यवसायातून त्यांना एका महिन्यामध्ये लाखोंपर्यंत उत्पन्न होत आहे
पुण्यात राहणाऱ्या मेघना बाफना यांनी कोशिंबीर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला व्हाट्सअपमधील ग्रुप कॉन्टॅक्ट आणि ओळखीच्या लोकांना त्यांनी आपल्या कोशिंबीरची विक्री केली. त्यानंतर हे उत्पादन सर्वांच्या पसंतीला पडल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचे ठरवले. त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली. आजच्या घडीला त्या 22 प्रकारच्या कोशिंबिरीचे उत्पादन बनवून विकतात. आणि दिवसभरात त्यांच्या 200 पर्यंत ऑर्डर्सही विकल्या जातात.
सुरवातीला मेघना यांनी या व्यवसायासाठी 3500 हजार रुपयांची गुंतवणूक केली. आता त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून महिण्यकाठी त्या 1.25 लाख रुपये कमावतात. त्या आपली नौकरी पण सांभाळून हा व्यवसाय पाहतात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी 15 लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”