हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील वटवाघळावर संशोधन करणाऱ्या ‘बॅट वुमन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शी झेंगली यांनी तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनीला नुकत्याच काही मुलाखती दिल्या आहेत त्यांनी कोरोना विषाणू हा तर हिमनगाचे केवळ एक टोक आहे. असे असंख्य विषाणू असण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये आपले थैमान घालत असलेला कोरोना हा एकमेव विषाणू नाही तर असे असंख्य विषाणू असू शकतात. आपण वेळेत संशोधन केले नाही तर जगाला यापेक्षाही भयानक रोगांना सामोरे जावे लागेल असे त्यांनी सांगितले आहे. त्या चीनमधील वुहान विषाणू संस्थेच्या उपसंचालक आहेत. गेले अनेक वर्षे त्या वटवाघळावर संशोधन करीत आहेत.
विषाणूच्या संशोधनामध्ये शास्त्रज्ञ आणि सरकार यांच्यामध्ये पारदर्शकता असणे खूप गरजेचे आहे. आणि आपल्याकडे ती नाही हे खूप खेदजनक आहे असे त्या म्हणाल्या. जर पुढे येणाऱ्या महामाऱ्यांपासून वाचायचे असेल तर आपल्याला अधिक प्रगतपणे वन्यप्राण्यांमध्ये आढळणाऱ्या या विषाणूंचा शोध लावला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी असेही सांगितले की त्या प्रयोगशाळेत ज्या जनुकीय गोष्टींवर काम करत आहेत त्याचा आणि कोरोना विषाणूचा काहीही संबंध नाही. “मी शपथ घेऊन सांगते की या विषाणूच्या प्रादुर्भावामध्ये माझा काहीही हात नाही” अशा आशयाची एक पोस्ट त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर टाकली आहे. अशाच एका दुसऱ्या मुलाखतीत वुहान विषाणू संस्थेच्या संचालकांनी विषाणू टोपीतून सुटला ही शुद्ध बनावटगिरी असल्याचे म्हंटले आहे.
अनेक वर्षांपासून वुहान विषाणू संस्था विषाणूच्या संशोधनामध्ये काम करते आहे. २००३ मधील SARS विषाणूनंतर वटवाघळावर संशोधन करण्यात आले आणि २०१३ मध्ये झेंगली यांनी त्यास सुरुवात केली होती. त्यांना SARS – COV-2 सारखे ९६.२% विषाणू वटवाघळामध्ये असल्याचे सापडले होते आणि २०१५ मध्ये त्यांनी जगाला वटवाघळांमधून SARS सारखा विषाणू मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती. शी काम करत असलेली प्रयोगशाळाच या विषाणूचा स्रोत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. त्यावर शी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.