हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासूसन जगभरात कोरोनाच्या संसर्ग आजाराने धुमाकूळ घातला आहे. जगभरातील सर्व शास्त्रज्ञ कोरोनाच्या आजारावर लस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. इटली , अमेरिका यांसारख्या देशामध्ये तर हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनने हा विषाणू हा हवेमार्फत लोकांच्या संपर्कात येत असल्याचे म्हंटले आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे. हेच लोक या आजारांपासून आपला प्राण वाचवू शकतात. या रोगाचा सर्वात जास्त धोका हा वयस्कर लोकांना आणि लहान मुलांना आहे. ज्या लोकांना अगोदर अनेक आजार आहेत अश्या लोकांना कोरोनाचा सामना करणे फार कठीण जाऊ शकते.
साऊथ कोरियाचे येऊनगंम युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सेंटर चे प्राध्यापक यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा अभ्यास करून त्यातून काही निष्कर्ष काढले आहेत. अनेक आजार असलेल्या लोकांचा मृत्यू अटळ आहे. असे मत त्यांनी निरीक्षणांतर्गत स्पष्ट केले आहे. हे साऱ्या लोकांचा समावेश हाय रिस्क झोन मध्ये करण्यात आला आहे.अश्या ११० लोकांच्या शवांचा अभ्यास करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारी ते १५ एप्रिल पर्यंत दाखल केलेल्या कोरोना रोगींचा अभ्यास केला गेला आहे त्यातून वेगवेगळे आजार असलेल्या लोकांची स्तिथी गंभीर असल्याचं बोललं जात आहे.
डायबेटीस असणाऱ्या लोकांना आहे. सर्वात जास्त धोका हा मधुमेह असणाऱ्या लोकांना आहे. हा विषाणू मधुमेह असणाऱ्या लोकांना जास्त धोकेदायक ठरत आहे. आत्तापर्यंत सर्वात जास्त मृत्यू हे शुगर असणाऱ्या लोकांचा झाला आहे. ज्या लोकांना शुगर आहे त्या लोकांना कोरोनावर मात करणे अवघड जात आहे. दुसऱ्या नंबर मध्ये ज्या लोकांना उष्णतेचा जास्त त्रास आहे हे लोक हाय रिस्क मध्ये मोडले जात आहेत. त्यानंतर ज्या लोकांना आक्सिजन घेण्यास त्रास जाणवत आहे. श्वसोच्छ्वासाचा त्रास आहे हे लोक सुद्धा हाय रिस्क असल्याचा दावा या रिसर्च पेपर मध्ये करण्यात आला आहे. ज्या लोकांनां अगोदर पासून हृदयाचा त्रास आहे अश्या लोकांना करोनावर मात करणे मुश्किल जात आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आदेशांचे पालन करत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर सर्वानी भर द्यावा असे मत मेडिकल सेंटर चे प्राध्यापक यांनी व्यक्त केले गेले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.