अर्थमंत्र्यांनी येणाऱ्या अधिवेशनात संसदेत पुरवणी अर्थसंकल्प मांडावा – पृथ्वीराज चव्हाण 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आता निरर्थक झाला असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून तसे सांगत पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी केली आहे. नवीन कर आकारणी, कर्ज योजना आणि सुधारित खर्चाचा समावेश करून अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात एक नवे अंदाजपत्रक सादर करून संसदेच्या मंजुरीसह ते सादर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कोरोना संकटकाळात देशातील धार्मिक स्थळांच्याकडून सोने मिळविले असता १ ट्रिलियन डॉलर उभे राहू शकतील हे म्हण्टल्यानंतर काही आठवड्यानी त्यांनी ही मागणी केली आहे.

मागच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटकाळासाठी २० लाख कोटी रुपयांचे उत्तेजन पॅकेज जाहीर केले होते. तसेच या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वावलंबनावर भर देण्यास त्यांनी सांगितले होते. अर्थात आत्मनिर्भर भारत ची संकल्पना मंडळी होती. हे २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज कामगार, फेरीवाले, रस्त्यावरील छोटे विक्रेते, शेतकरी, व्यापारी वर्ग यांना फायद्याचे ठरेल असेही पंतप्रधान म्हणाले होते.

 

पंतप्रधान यांच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा तपशील १३ मे रोजी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी जाहीर केला होता. एकूणच संकटाची तीव्रता पाहता आणि राज्यातील एकूण परिस्थिती पाहता आता अर्थ मंत्रालयाने नवीन अंदाजपत्रक जाहीर करावे अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी निर्मला सितारमन यांनी संसदेत या अंदाजपत्रकाची मंजुरी घेतली पाहिजे असेही त्यांच्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment