हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच तीन महिने देशात कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. देशातील रुग्णसंख्या वाढते आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राने ८८ हजारचा आकडा पार केला आहे. मात्र संचारबंदीमुळे सर्वत्र अर्थव्यवस्था ही कोलमडली आहे. अशा परिस्थितीत आता अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी काम करावे लागणार आहे. मात्र अद्याप नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना होणार नाही ना? या भीतीने अनेकांनी घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना प्रोत्साहित करीत रोहित पवार यांनी बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्राँग करा असे आवाहन महाराष्ट्रातील नागरिकांना केले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवर सतत कार्यरत असतात. या माध्यमातून ते नागरिकांशी सतत संपर्कात असतात. आता महाराष्ट्रात संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात मिशन बिगिन अगेन च्या माध्यमातून महाराष्ट्राला या संकटातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. कोरोनाशी लढा सुरु आहेच मात्र अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीही आता लढावे लागणार आहे. म्हणूनच पवार यांनी जनतेला आवाहन केले आहे. ‘कोरोनाच्या भितीने अनेकांच्या मनात घर केलंय. पण आता ही भिती झुगारुन घरात न बसता बाहेर पडूनच कोरोनाशी लढावं लागणार आहेत. नियमांचं शस्र हाती घेऊन आपण बाहेर पडलो तर आपल्यावर हल्ला करण्याची संधीच कोरोनाला मिळणार नाही.’ असे ट्विट पवार यांनी केले आहे.
कोरोनाच्या भितीने अनेकांच्या मनात घर केलंय. पण आता ही भिती झुगारुन घरात न बसता बाहेर पडूनच कोरोनाशी लढावं लागणार आहेत. नियमांचं शस्र हाती घेऊन आपण बाहेर पडलो तर आपल्यावर हल्ला करण्याची संधीच कोरोनाला मिळणार नाही.
म्हणून म्हणतो….
बाहेर पडा काम करा,
महाराष्ट्राला स्ट्रॉंग करा.— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 10, 2020
राज्यात आता हळूहळू सर्व कामकाज सुरु केले जात आहे. मात्र सर्वाना सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक असणार आहेत. म्हणून घाबरून जाऊन घरात बसून उपयोग नाही. कधीतरी घरातून बाहेर पडावेच लागेल असे म्हणत रोहित पवार यांनी हे ट्विट केले आहे. त्यांनी ‘ बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्रॉंग करा.’ असे आवाहन सर्वाना केले आहे. कोरोना संकटातून सावरून अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आणण्याचे नवे आव्हान सरकारपुढे असणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.