व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाईन अभ्यासासाठी सरकार सर्व विद्यार्थ्यांना 10 जीबी इंटरनेट डेटा फ्री देत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देश सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगा विरुद्ध झुंज देत आहे. शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वजण ऑनलाईनच शिकत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे की, केंद्र सरकार देशभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी 10 जीबी फ्री इंटरनेट डेटा देत आहे. जेणेकरून ते कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ऑनलाईन परीक्षा देऊ शकतील. या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘कोरोना विषाणूमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद झाली आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे, म्हणून सरकार सर्व विद्यार्थ्यांना फ्री इंटरनेट (दररोज 10 जीबी) देत आहे.’

विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन वर्गांच्या मदतीने परीक्षा घेता यावी यासाठी शासन असे करत असल्याचेही निवेदनात म्हटले गेले आहे. यामध्ये एक लिंक देखील देण्यात आलेली आहे आणि असे म्हटले गेले आहे की, या लिंकवरून आपल्याला फ्री इंटरनेट पॅक (दररोज 10 जीबी) मिळविण्यासाठी आपण फॉर्म भरू शकता.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1313411291529109504/photo/1?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1313411291529109504%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fpib-fact-check-modi-government-is-giving-10gb-internet-data-free-to-all-students-for-studying-online-3283863.html

या व्हायरल पोस्टच्या शेवटी हे देखील लिहिले गेले आहे की, लोकांच्या सोयीसाठी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सुविधेचा लाभ मिळू शकेल. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने जेव्हा या मेसेजच्या सत्यतेची तपासणी केली तेव्हा हे बनावट असल्याचे दिसून आले. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये असे म्हटले आहे की, हा दावा खोटा आहे. असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. यापूर्वीही सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत होती, ज्यामध्ये असा दावा केला जात होता की, सरकार ऑनलाईन अभ्यासासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन वाटप करीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.