कोरोनामुक्त तरुणीला खडतर प्रवास करुन सोडले घरी; मुख्यमंत्र्यांनी १ लाखाचं बक्षिस देऊन गौरवलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लैबी या महिलेने चक्क रिक्षाने एका कोरोनामुक्त व्यक्तीला १४० किमी दूर तिच्या घरी सोडल्याची घटना समोर आली आहे. मणिपूर गुवाहाटी येथील इम्फाल येथील या महिलेच्या या कामाची दखल आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असून तिला १ लाख १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन तिचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी मी माझे काम करत होते, मुख्यमंत्री दखल घेतील अशी कल्पना कधीच केली नव्हती. असे त्या म्हणाल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या आजारातून मुक्त झालेली एक मुलगी तिच्या घरी जाण्यासाठी गाडी बघत होती. लैबी हा प्रवास १४० किमीचा तसेच ८ तासांपेक्षाही जास्त काळाचा होता. या मुलीला कुणीही घरी सोडण्यास तयार नव्हते. दोन आठवडे कोरोनाशी झुंज दिल्यानंतर सोमिथॉन चिथुंग या २२ वर्षीय तरुणी इम्फाल च्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्था इथून कोरोना चाचणी नकारात्मक आल्यावर  घरी जाण्यासाठी तयार होती. पण घरी जायला तिला कोणतेच वाहन मिळत नव्हते. एका ठराविक ठिकाणापर्यंत रुग्णवाहिका सोडेल तिथून पुढे तुम्ही स्वतः गेले पाहिजे असे तिला सांगण्यात आले होते. ती घरी सोडण्यासाठी वाहन आणि ड्राइव्हर शोधत होती. पण तिला कुणी मिळाले नाही शेवटी लैबीने होकार दिला.

हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रवास होता असे तिने सांगितले आहे. प्रथम जेव्हा ती रिक्षा चालवायला तयार झाली तेव्हा सोमिथॉन ला विश्वास बसला नाही मात्र जेव्हा तिने स्वतःची रिक्षा असल्याचे सांगितले तेव्हा त्यांना पटले असे ती म्हणाली. तिने या प्रवासाचे ५ हजार रु घेण्याचे सांगितले आणि रस्त्यावर मासे विकणारी लैबी रिक्षा चालकाच्या गणवेशात अवतरली. तिने अशा पद्धतीने मदत केल्यामुळे तिचे आता सर्वत्र कौतुक केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.