भारतातील पहिली स्वयंचलित कोरोना टेस्टिंग मशीन लाँच, दरदिवशी ४०० टेस्ट करण्याची क्षमता 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील एका कंपनीने भारतातील पहिले स्वयंचलित कोरोना टेस्टिंग मशीन लॉन्च केले आहे. माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड अँड सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने हे मशीन लॉन्च केले आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या मशीनची दरदिवशी ४०० टेस्ट करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे मशीन ऑपरेट करण्यासाठी केवळ एकाच व्यक्तीची आवश्यकता भासणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या मशीनद्वारे कोरोनाकाळासारख्या कठीण काळात आपण मनुष्यबळ वाचवू शकू असे ते म्हणाले आहेत. यासोबतच देशातील कोरोना टेस्टिंगचा वेग देखील वाढू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. माय लॅब सोल्युशन्स ने एका ट्विट मध्ये कोविड-१९ च्या टेस्टिंग लॅब उघडणे सोपे झाले असल्याचे म्हंटले आहे.

 

या मशीनच्या लॉन्चिंगच्या वेळी पुनावाला यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस येऊ शकेल असे सांगितले. सध्या भारतात क्षमतेपेक्षा खूप कमी प्रमाणात टेस्टिंग होत असल्याचे ते म्हणाले. त्याबरोबरच भारताकडे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग किट तयार करण्याची क्षमता आहे मात्र ते विकायचे कुठे हा प्रश्न आहे असेही ते म्हणाले.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment