हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कोरोना विषाणूचा या साथीच्या रोगाला रोखण्यात काही प्रमाणात यश मिळालेले आहे परंतु केवळ तेच या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पुरेसे नाही आहे. एका ताज्या अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, लॉकडाउन बरोबरच फेस मास्क लावला तर हे टाळता येते. जरी बाजारात अनेक प्रकारचे मास्क मिळत आहेत, मात्र सोशल मीडियावर यावेळी एक खास प्रकारच्या मास्कची चर्चा होते आहे, ज्यामध्ये एलईडी बसविण्यात आली आहे.
हा फेस मास्क अमेरिकन गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टायलर ग्लेयल याने तयार केला आहे. द न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, हा मास्क लावताच प्रकाश पडेल. या कपड्याच्या मास्कमध्ये एकूण १६ एलईडी लाइट आहेत. ही लाइट आपण कधी बोलतो आणि केव्हा आपण गप्प असतो हे सांगेल. आपण हसल्यानंतर या मास्क समोर स्माइली सिम्बॉल तयार केले जाते. या मास्कची किंमत सुमारे ३८०० रुपये असल्याचे सांगितले जाते.
— Tyler Glaiel (@TylerGlaiel) May 25, 2020
अशी सुचली कल्पना
अमेरिकन प्रोग्रामर टेलरच्या म्हणण्यानुसार अचानक असा मास्क बनवण्याची कल्पना त्याच्या मनात आली. तो म्हणतो, ‘मला असा मास्क ऑनलाईन सापडला नाही,त्यामुळे मी तो स्वतः तयार केला. यात ९-वॉल्टची बॅटरी आहे जी एलईडी पॅनेलला सपोर्ट देते. या मास्कमध्ये एलईडीशी जोडलेला एक व्हॉईस पॅनेल आहे. जेव्हा एखादा माणूस बोलतो आणि शांत बसण्यासारखे वागतो तेव्हा ही लाईट लागते. टेलर म्हणतो, “मी आत्ता ते फक्त माझ्यासाठीच बनवले आहे. माझी आत्ता त्याला विकण्याची कोणतीही योजना नाही.”
मास्क धुण्यापूर्वी लाईट काढली जाऊ शकते
टेलर म्हणतो की, ‘ हा मास्क कपड्याने बनलेला आहे, म्हणूनच तो वॉशेबल देखील आहे. जेव्हा त्याला धुवायचे असेल तेव्हा ते लाइटचे पॅनेल काढून टाकले जाऊ शकते. कारण त्यात एलईडी लाईट आहेत, जे काही तासांनंतरही गरम होतात म्हणून मुलांसाठी ते योग्य नाही आहे
एलईडी फेस मास्क म्हणजे काय?
एलईडी फेस मास्क वेगवेगळ्या वजनाच्या प्रकाश किरणांचे उत्सर्जन करून त्वचेच्या विविध समस्यांवर ईलाज करतात. उदाहरणार्थ, एम्बर लाईट जे की चेहऱ्यावरील कोलेजन आणि इलेस्टिनला उत्तेजित करण्यास मदत करते. लाल एलईडी लाइट चेहऱ्यावरील सूज कमी करते आणि ब्लड सर्क्युलेशन वाढविण्यात मदत करते. त्याच वेळी, त्यातील निळ्या प्रकाशामुळे मुरुमांमुळे तयार होणारे बॅक्टरीया नष्ट होतात.
प्रश्न का उठत आहेत?
न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बर्याच लोकांनी याविषयी तक्रार केली की, या एलईडी फेस मास्कचा आपल्या डोळ्यावर दुष्परिणाम होतो. त्यांचा वापर केल्याने आपले डोळे खराब होऊ शकतात. अनेक युझर्सनी आपल्याला डोळ्यांच्या इंफेक्शनची समस्या झाल्याची तक्रार केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की हा एलईडी फेस मास्क डोळ्यांसाठी धोकादायक आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.