काँग्रेस पाकिस्तानच्या नव्हे तर शरणार्थी लोकांच्या विरोधात – नरेंद्र मोदी

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेस पाकिस्तानच्याविरोधात नव्हे तर तिथून भारतात आलेल्या पीडित शरणार्थींच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्नाटकातील तुमकूर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

सुप्रिया सुळे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार; ‘टॉप टेन’ खासदारांत महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश

नवी दिल्ली : लोकसभेतील कामगिरीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. लोकसभेतील महत्वाच्या चर्चांमध्ये सुप्रिया सुळेंचा कायम सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कामगिरीत अजून एका विक्रमाची भर पडली आहे. खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या आहेत. लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तसेच विविध मुद्द्यांवरील चर्चेतील सहभागाबाबत ‘पीआरएस … Read more

पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आवाज उठवा; पंतप्रधान मोदींचे आंदोलन कर्त्यांना आवाहन

तुमकुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. तुमकुरु येथे श्री शिवकुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधल्या जाणाऱ्या संग्रहालयाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी भाषण केले. ते म्हणाले की, जे लोक आज भारतीय संसदेविरोधात आंदोलन करीत आहेत त्यांना मला सांगायचे आहे की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची ही कारवाई उघडकीस आणण्याची गरज आहे. जर तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर … Read more

कोटामध्ये गेल्या महिनाभरातील मृत बालकांचा आकडा १०० पार

बिहारमध्ये गतवर्षी झालेल्या इनसिफिलायटीसमुळे शंभरहून अधिक बालकं दगावल्याचं चित्र समोर आलं होतं. असाच काहीसा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील कोटा या ठिकाणी पहायला मिळाला आहे. राजस्थानमधील जे. के. लोन रुग्णालयात महिन्याभरात सुमारे १०० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांतच ९ बालकांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाने आता गंभीर स्वरुप धारण केले आहे.

बच्चू कडू यांच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे दिले होते आदेश

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल पाहिल्याच दिवशी दर्यापूर तहसील कार्याला भेट देत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत दोन तहसीलदारांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले होते. नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक प्रमोद काळे आणि सपना भोवते यांच्यावर ही कारवाई केली होती. बच्चू कडू यांच्या या निर्णयानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. … Read more

आम्ही स्वतःला राजकारणापासून दूर ठेवतो, सरकारच्या आदेशानुसार काम करतो – बिपीन रावत

हॅलो महाराष्ट्र टीम : नवनियुक्त मुख्य संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी सांगितले की, सशस्त्र सेना स्वत: ला राजकारणापासून दूर ठेवते आणि सरकारच्या निर्देशानुसार काम करते. सशस्त्र दलाचे राजकारण केले जात असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले. जनरल रावत म्हणाले की, सीडीएस म्हणून त्यांचे लक्ष्य तिन्ही दलांतील समन्वयावर आणि संघाप्रमाणे कार्य करणे … Read more

नववर्षानिमित्त सचिननं ट्विटवर शेअर केला दिव्यांग खेळाडूचा प्रेरणादायी व्हिडीओ;नेटकरी भारावले

नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प लोक करत असतात. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असलेली प्रेरणा कधी कुटुंबियांकडून, कधी मित्रांकडून तर कधी समाजमाध्यमांवरून मिळत असते. संकल्प तडीस नेण्याच्या दृष्टीनं असाच एक प्रेरणा देणारा विडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय होते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन 2020’? भारत महासत्ता झाला आहे का? वाचा सविस्तर

टीम हॅलो महाराष्ट्र : 1999 हे वर्ष संपून 2000 हे नवीन वर्ष सुरू होणार होते, त्यावेळी जगभरात मोठा उत्साह होता. कॅलेंडरमधील वर्षाचे आकडे पूर्णत: बदलत असल्याच्या घटनेचे आपण साक्षीदार बनत असल्याच्या भावना, त्या उत्साहात अधिक होत्या. नवीन सहस्रक ( मिलेनियम गोल्स) खरे तर 2001 मध्ये सुरू होणार होते; परंतु त्याची सुरुवात 2000 मध्येच अनेकांनी केली … Read more

भारतीय वायुसेनेनं दिल्या नवर्षाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा; व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या भावना    

जगभरासोबत भारतात नवीन वर्ष साजर होत आहे. प्रत्येकजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करत आहेत. राजकारणी, खेळाडू, सिने अभिनेते असे विविध सेलिब्रिटी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना भारतीय वायुसेना सुद्धा यात मागे राहिली नाही आहे. भारतीय वायुसेनेनं एका आगळया-वेगळया पद्धतीनं आनंद व्यक्त करत देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतील तेव्हाच देश प्रगती करेल- लष्करप्रमुख मनोज नरवणे

लष्कराचे उपप्रमुख असलेल्या मराठमोळ्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद (एम. एम.) नरवणे यांनी मंगळवारी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मनोज नरवणे देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून मंगळवारी ते लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत.