Toll Plaza वर NHAI ला दररोज होते आहे 1.8 कोटींचे नुकसान … यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात मोठ्या संख्येने टोल प्लाझा (Toll Plaza) आहेत. जे स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चालवित आहेत. मात्र गेले काही काळ त्यांच्या काही टोल प्लाझावर दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी लोकसभेत (Loksabha) दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”देशात शेतकरी आंदोलनामुळे टोल प्लाझावर नुकसान होत आहे.”

विशेष म्हणजे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी गेल्या 79 दिवसांपासून गाझीपूर, टिकरी आणि सिंघु सीमेवर आंदोलन करत आहेत. परंतु, लोकसभेत दिलेल्या उत्तरादरम्यान, नुकसान कसे केले जात आहे हे गडकरींनी सांगितले नाही. शेतकऱ्यांनी टोल ताब्यात घेतले आहेत किंवा शेतकऱ्यांनी तिथले रस्ते रोखले आहेत, ज्यामुळे वाहने हलू शकत नाहीत आणि त्यामुळे टोल बंद राहिले आहेत.

दिल्लीत 1.10 लाख कोटींचे नुकसान झाल्याचे कॅट म्हणाले
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांचे म्हणणे आहे कि,” दिल्ली येथे व्यवसायाचे दोन मार्ग आहेत. एक, दिल्लीत इतर राज्यांतून माल घेतला जातो. दुसरे म्हणजे दिल्लीशेजारील इतर राज्ये आणि शहरे येथून मोठ्या संख्येने लोकं दररोज येथे सामान घेण्यासाठी येतात. पण हा व्यवसाय गेल्या 79 दिवसांपासून रखडला आहे.”

एकट्या 70 हजार कोटींचे नुकसान त्या व्यावसायिकांचे झाले आहेत जे इतर राज्यांकडून माल खरेदी करतात. त्याचबरोबर 40 हजार कोटींचे नुकसान त्या व्यापाऱ्यांचे झाले आहे जे इतर शहरे किंवा राज्यामधून माल खरेदी करण्यासाठी जातात.

ज्या व्यापाऱ्यांना सर्वांत जास्त नुकसान झाले आहे त्यामध्ये एफएमसीजी उत्पादने, कन्झ्युमर ड्युरेबल्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयर्न आणि स्टील, टूल्स, पाईप अँड पाईप फिटिंग्स, मशीनरी इक्विपमेंट्स अँड इम्प्लीमेंट्स, मोटर्स अँड पंप्स, बिल्डर हार्डवेअर, केमिकल्स, फर्नीचर आणि फिक्स्चर, लाकूड आणि प्लायवुड, खेळणी, वस्त्र, रेडिमेडचा गारमेंट्स , हॅन्डलूम गारमेंट्स आणि हॅन्डलूम बेड फर्निशिंग, इलेक्ट्रिक व वायवीय उपकरणे व इतर विविध उद्योगांमध्ये वापरली जाणारी इतर औद्योगिक उत्पादने यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like