आता स्वतःची कंपनी उघडणे झाले खूप सोपे, 1 जुलै पासून बदलणार नियम; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी उघडणे खूप सोपे केले आहे. यासाठी केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नव्या नियमांना अधिसूचित केले आहे. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. या नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठीची कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आता दूर केली गेली आहे. जर आपल्याला सोप्या शब्दात सांगायचे तर आपल्याला फक्त आधार क्रमांक द्यावा लागेल आणि इतर सर्व माहिती ही सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे द्यावी लागेल.

सेल्फ-डिक्लरेशनच्या माहितीची अशी पडताळणी केली जाईल
या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या Udyam Registration Process ला इन्कम टॅक्स आणि जीएसटी सिस्‍टमला एकमेकांशी जोडल्यामुळे हे शक्य झाली आहे. यातून एखाद्या व्यक्तीने दिलेल्या सर्व माहितीची पॅन नंबर किंवा जीएसटीआयएनमध्ये दिलेल्या डिटेल्सच्या आधारे याची पडताळणी केली जाईल. या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की केंद्र सरकारने पेपरलेस कंपनी उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ही व्यवस्था सुरू केली आहे. या नव्या यंत्रणेअंतर्गत कोणतीही व्यक्ती फक्त आपला आधार क्रमांक देऊन आपल्या कंपनीचे रजिस्‍ट्रेशन करू शकते.

एमएसएमई अंतर्गत कोणाचे वर्गीकरण केले जाईल
केंद्राने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता एक एमएसएमई एक एंटरप्राइझ म्हणून ओळखले जाईल. वास्तविक, केंद्राचा असा विश्वास आहे की उद्यम एंटरप्राइझ हा जवळचा शब्द आहे. त्याचप्रमाणे, या Registration Process ला Udyam Registration देखील म्हटले जाईल. एमएसएमई अंतर्गत केवळ Plant आणि मशीनरी किंवा इक्‍वीपमेंटमध्ये केलेली गुंतवणूक आणि व्यवसाय यांना वर्गीकृत केले जातील. या अधिसूचनेमध्ये असे स्पष्ट केले गेले आहे की जेव्हा एखाद्या एंटरप्राइझचा टर्नओवर मोजला जातो तेव्हा वस्तू किंवा सेवा किंवा दोघांची निर्यात स्वतंत्र ठेवली जाईल.

१ जुलैपूर्वी पोर्टलची माहिती दिली जाईल
या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, पोर्टलद्वारे ऑनलाइन रजिस्‍ट्रेशन प्रोसेसला पूर्ण केले जाऊ शकते. या पोर्टलची माहिती 1 जुलै 2020 पूर्वी देण्यात येईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई मंत्रालय) 1 जून 2020 रोजी गुंतवणूक आणि उलाढालीच्या आधारे एमएसएमई क्‍लासिफिकेशनच्या नवीन गाईडलाईन्सना अधिसूचित केले. 1 जुलै 2020 पासून हे नवीन नियम लागू होतील. या नियमांच्या आधारे मंत्रालयाने शुक्रवारी एक सविस्तर अधिसूचना जारी करुन उद्योजकांच्या रजिस्‍ट्रेशनसाठी एक नवीन यंत्रणा दिली.

आपल्याकडे आधार क्रमांक नसल्यास आपण अशा प्रकारे अर्ज करू शकता
ज्यांच्याकडे अजूनही व्हॅलिड आधार क्रमांक नाहीये, ते सिंगल विंडो सिस्टमवर आधार एनरोलमेंट रिक्‍वेस्‍ट किंवा बँक फोटो पासबुक, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) देखील वापरू शकतात आणि रजिस्‍ट्रेशनसाठी अर्ज करू शकतात. सिंगल विंडो सिस्टम अंतर्गत त्यांचा वैध आधार क्रमांक मिळाल्यानंतर त्यांना रजिस्‍ट्रेशनसाठीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही नवीन रजिस्‍ट्रेशन, क्‍लासिफिकेशन तसेच फॅसिलिटेशनची व्यवस्था अत्यंत सोपी आणि त्रास-मुक्त आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.