अमेरिकेतील महामार्गावर एका विमानाने आपत्कालीन लँडिंग करत कारला दिली धडक, व्हायरल व्हिडिओ पहा

वॉशिंग्टन । अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यात आपत्कालीन परिस्थितीत एका विमानाने तातडीचे लँडिंग केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकित व्हाल. वास्तविक, घडलं असं की, विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटला रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या मध्ये उतरावं लागलं. विमान उतरताना त्याने एका कारला धडकही दिली.

https://twitter.com/MnDOT/status/1334631479603843073?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1334631479603843073%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fworld%2Fplane-landed-on-busy-highway-america-nodsm-3367540.html

या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही
वृत्तानुसार, अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यात बुधवारी रात्री साडेनऊ वाजता एका इंजिनच्या विमानाने आपत्कालीन लँडिंग केले. विमान एका कारला धडकल्यानंतरही कोणाला दुखापत झाली नाही. मिनेसोटा डिपार्टमेंट ऑफ ट्रांसपोर्ट ने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

https://t.co/qH8BF3LZto?amp=1

मिनेसोटा डिपार्टमेंट ऑफ ट्रांसपोर्टने ट्वीट करून व्हिडिओ शेअर केला
हा व्हिडिओ मिनेसोटा डिपार्टमेंट ऑफ ट्रांसपोर्टने ट्विट केलेला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, काल रात्री एक विमान 35 डब्ल्यू हायवेवर विमान उतरले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही याचा आम्हाला आनंद आहे. वैमानिकाच्या हुशारीमुळे एक मोठा अपघात रोखला गेला.

हा व्हिडिओ 4 डिसेंबर रोजी शेअर केला गेला होता. आतापर्यंत हा व्हिडिओ 1.1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासह 2 हजाराहून अधिक लाईक्स आणि एक हजार री-ट्वीट झाले आहेत. ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना लोकांनी असे लिहिले आहे की, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही याचा आम्हाला आनंद झाला आहे.

https://t.co/3L0cVH0c9d?amp=1

https://t.co/tFxvJOLDoH?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.