म्हणुन सोनाक्षी सिन्हाने बंद केले आपले ट्विटर अकाऊंट…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दबंग सिनेमात आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी सोनाक्षी सिन्हा हिने आपले ट्विटर अकॉउंट डिऍक्टिव्हेट केले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून तिने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तिने इंस्टाग्रामवर “आग लगे बस्तीमें मै… में अपनी मस्तीमें…बाय ट्विटर.” अशी पोस्ट करीत ट्विटर डिऍक्टिव्हेट केल्याची माहिती दिली आहे.

‘तुमची पवित्रता जपण्याचे पहिले पाऊल म्हणजे नकारात्मकेपासून दूर राहणे होय. यादिवसांत ट्विटरपेक्षा जास्त कुठे ती नकारात्मकता नाही आहे. चला मी बंद करीत आहे. माझे ट्विटर अकॉउंट डिऍक्टिव्हेट करत आहे. बाय. अशा ट्विटचा स्क्रिनशॉट तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात सक्रिय आहे. ट्विटरवरही ती चांगलीच अ‍ॅक्टीव्ह होती. मात्र अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. ज्यानंतर सोनाक्षी सिन्हाने एक ट्विट केलं. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर सोनाक्षीने तिचं ट्विटर अकाऊंट डीअ‍ॅक्टीव्हेट केलं. याबद्दलची माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली.


View this post on Instagram

 

Aag lage basti mein… mein apni masti mein! Bye Twitter ????????

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on Jun 20, 2020 at 4:04am PDT

 

सध्या सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये बरेच वाद निर्माण होत आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाहीची चर्चा होते आहे. काहींनी बॉलिवूडमधील एकाधिकारशाहीविरुद्ध आता मोकळेपणाने बोलावयास सुरुवात केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.