साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी

‘साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.

आज ताकद दाखविली तरच पुढच्या निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

काँग्रेस-राष्ट्रवादीने आता एकत्र काम करून भाजपचा पाडाव करणे आवश्यक आहे. आज राजकीय ताकद दाखविली तरच पुढच्या महापालिका निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, त्यासाठी आता कामाला लागावे व काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी आघाडी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ.पाटील बोलत होते. बैठकीला उमेदवार पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, मनिषा रोटे, उत्तम साखळकर, नामदेवराव मोहिते, संजय बजाज, कमलाकर पाटील, मैनुद्दीन बागवान, महेश खराडे आदी उपस्थित होते.

आघाडीच्या फक्त ४० जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी वर टीकास्त्र सोडले आहे. ‘येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस , राष्ट्रवादी आघाडीच्या फक्त ४० जागा असतील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ही त्यांना मिळणार नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

अकोले मध्ये भाजपला मोठा धक्का

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आज अजित पवार यांच्या सभेमध्ये आणि उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान मधुकर पिचड यांच्या विरोधात ‘एकास एक लढत’ देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली असून लहामटे आणि … Read more

शरद पवार यांनी यशवंतरावांना फसवलं – उद्धव ठाकरे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची काँग्रेस आणि इंदिरा गांधींनी शेवटच्या काळात अवहेलना केली. शरद पवार यांनी यशवंतरावांना फसवलं..वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते कराडमध्ये शिवाजी स्टेडियमवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या सांगता सभेत बोलत होते. ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यांनी गमतीजमती … Read more

अमरावतीतून लढणाऱ्या ‘या’ उमेदवाराच्या प्रचाराला शरद पवार हजेरी लावणार

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या निवडणूक लढणार आहेत. नवनीत राणा या अमरावतीतल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत सहभागी करुन घेतले आहे. नवनीत राणा अमरावतीतून युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीत राणा … Read more