फटाका फुटला अन् नवरदेवाला घेऊन घोडा सुसाट निघाला मागे वऱ्हाडही धावले

औरंगाबाद – डीजेच्या तालावर तरूणाई बेधुंद होऊन नाचायला लागली. मंडपात लवकर जाण्याच्या ओढीने नवरदेवही घोड्यावर स्वार झाले. तिकडे नवरीबाईही सजल्या-धजल्या, अन् अशात नवरदेव स्वार झालेल्या घोड्याच्या मागे कुणीतरी सुतळी बॉम्ब पेटविला. क्षणात धडाम् धूम आवाज झाला. तो ऐकून घोडा बिथरला अन् नवरदेवाला घेऊन सुसाट निघाला ! त्यांना शोधायला अख्खे वऱ्हाड धावले अन् गावकरीही सरसावले. शेवटी … Read more

कोट्यवधींचा हेल्थ केअर घोटाळा ! आरोपी आर्थिक गुन्हेशाखेच्या ताब्यात

Fraud

औरंगाबाद – दरमहा 350 रुपये याप्रमाणे 20 महिने 7 हजार रुपये गोळा करून शहरातील शेकडो नागरिकांना तब्बल 30 लाख 13 हजार 85 रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात हेल्थकेअर कंपनीचा प्रमुख नंदलाल केसरसिंग याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. घोटाळा कोट्यावधी रुपयांचा असल्याची माहिती शिक्षक दादाराव सिणगारे यांनी दिली आहे. तसेच ज्यांनी तक्रार केलेली नाही, त्यांनी … Read more

…अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणार – हर्षवर्धन जाधव

jadhav

औरंगाबाद – राज्य आणि केंद्र सरकारमधील दोन मंत्री लाभलेल्या सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीची दाहकता गंभीर आहे. या अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिवाळीपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरात मदत न मिळाल्यास सत्तेत असलेल्यांना शेतकऱ्यांचा इंगा दाखवत सळो-की-पळो करणार असल्याचा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दिला. यावेळी अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिवाळी पर्यंतचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. मागील वर्षीच्या रखडलेल्या … Read more

सिडको वाळूज महानगरचा मनपामध्ये समावेश होण्याच्या हालचालींना वेग

औरंगाबाद – वाळूज परिसरातील सिडको महानगर प्रकल्प टप्पा 1 मधील सिडकोने विकसित केलेल्या वसाहती औरंगाबाद महानगर पालिकेच्या हद्दीत आणण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी या प्रक्रियेसाठी सिडको आणि महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे. तसेच या प्रक्रियेची व्यवहार्यता आणि परिणामांसंबंधीचा माहिती सादर करण्यासाठीचा अहवाल येत्या ४५ दिवसांत सादर … Read more

संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

uday samant

औरंगाबाद – भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये व संस्कारांची समाजात निर्मिती करणे, सांप्रदायिक कलांचा अभ्यास करणे अशी अनेक उद्दिष्ट्ये संतपीठ स्थापनेमागची आहेत. ह्या उद्दिष्टांची पुर्ती करण्यासाठी श्री क्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकारत लवकर सुरु करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विभागीय … Read more

औरंगाबाद नगर महामार्ग घेतोय अनेकांचे जीव

Accident

औरंगाबाद  |  औरंगाबाद- नगर महामार्ग परिसरातून विविध मोठ्या शहरात जाण्यासाठी नगर याच मार्गाचा वापर केला जातो. मात्र वाळुज ते दहेगाव बंगला (ता. गंगापुर) या मार्गात दहा किलोमीटरवर विविध ठिकाणी हॉटेलवर चहा जेवण नाष्टा व इतर साहित्यांची दुकाने आहेत .अशा दुकानांवर ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. पाठीमागून येणाऱ्या वाहनधारक वाहनांची मोठी दिशाभूल होऊन आपल्या … Read more

नागरिकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी साधला फेसबूक लाइव्हद्वारे संवाद

औरंगाबाद | मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबाद जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे, ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनावर कसा अटकाव आणता येईल, काय उपाययोजना कराव्या लागतील, नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, अशा अनेक मुद्द्यावर आज फेसबूक लाइव्हमध्ये माहिती दिली. … Read more

यंदा होळी सणावर कोरोनाचे सावट, साखर गाठींच्या विक्रीवर होणार परिणाम…

औरंगाबाद | होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत आहे. यंदा संपूर्ण राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गाठींच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शहरातील दुकाने सध्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गाठ्यांनी सजली आहेत. होळीपूजन गाठीशिवाय अपूर्ण असते. नवीन लग्न झाल्यावर वधूमंडळी वरास गाठीची भेट देतात. शिवाय, शेजाऱ्यांना, आप्तांनाही … Read more

यंदाही होळीवर कोरोनाचे सावट; रंग, पिचकाऱ्या विक्रेत्यांना आर्थिक फटका

औरंगाबाद | होळी सण हा अत्यंत महत्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. अनेकजण मोठ्या उत्साहात होळी सण सामूहिकरित्या साजरा करतात. मोठ्या प्रमाणावर शहरात रंगांची उधळण करत विविध गाण्यांवर तरुणाई थिरकताना देखील दिसते. परंतु त्यावर देखील आता मयार्दा आल्या आहेत. मागील वर्षी कोरोनाचे आगमन झाले आणि होळीवर कोरोनाचे सावट पसरले. तेच सावट यंदाही कायम असून रंग विक्रेते, … Read more

घाटी रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी, नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश

औरंगाबाद | कोरोनाचा आकडा वाढत असताना  मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यात घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ रुग्ण तर नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती घाटी रुग्णालयाने जाहीर केली आहे. … Read more