72 वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; चाऱ्याच्या गंजीला लागली होती आग

fire

औरंगाबाद | जिल्ह्यातील आडुळ या गावांमधील एका शेतकऱ्याच्या चाऱ्याची गंजी व कपाशीच्या फसाटीला आग लागली होती. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीत बहात्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. औरंगाबाद तालुक्यातील खोडेगाव शिवारात गुरुवारी (दि. 10) सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंढरीनाथ अश्रुबा खाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. खोडेगाव येथील शेतकरी पंढरीनाथ खाडे यांची बेंबळ्याचीवाडी … Read more

घाटी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची निर्मिती

mucormycosis black fungus

औरंगाबाद: कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होत असताना आता म्युकरमायकोसिसचा धोका औरंगाबाद शहरात वाढत आहे. यामुळे औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णाचे उपचार अगदी मोफत होणार असून, महागडे इनजेक्शन तसेच सर्व औषध सुद्धा मोफत मिळणार आहे. या वार्डमध्ये 90 म्युकॉर्मयकॉसिसग्रस्त रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. दरम्यान, … Read more

औरंगाबाद येथे कोचिंग क्लास चालक आणि शिक्षक यांचे धरणे आंदोलन

औरंगाबाद: राज्यात कोरोनाचे संकट काहीसे कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आता निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दुकाने तसेच आस्थापना सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी शिकवण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी आज (10 जून) औरंगाबादेत आंदोलन करण्यात आले. यावेळी खासगी शिवकण्यांचे चालक, मालक आणि … Read more

सावधान ! शहरात सात दिवसात 38 बालके कोरोना बाधित

औरंगाबाद | कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत बालकांना अधिक धोका असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. मात्र दुसर्‍या लाटेत ही शहरातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे तीन हजार मुलांना कोरोना झाल्याची मनपाकडे नोंद आहे. आता संसर्ग कमी झाला असला तरी मागील सात दिवसात 0 ते 18 वयोगटातील केवळ 38 मुले बाधित आढळली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत … Read more

मुकुंदवाडी संजय नगर मध्ये अवैध दारू विक्रेत्यांची दहशत

Daru Crime

औरंगाबाद :शहरात अनेक ठिकाणी नशेखोरीचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांना मानसिक त्रास, महिलांची छेडछाड, वाहनांची तोडफोड आदी घटना घडत आहे. मुकुंदवाडीत सर्वाधिक अवैध दारू विक्री सुरू आहे. दारु या विक्रेत्यांच्या दहशतीमुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गेल्या सहा दिवसात या भागातील त्रस्त महिलांनी दोन वेळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांकडून कारवाई होत … Read more

औरंगाबाद शहरात ‘CBI’ छापेमारीच्या चर्चेला उधाण; पोलिसांकडून मात्र दुजोरा नाही

CBI

औरंगाबाद | आज सकाळपासून शहरात अनेक ठिकाणी सीबीआयच्या पथकाने कारवाई केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र आशा कारवाई बाबत कोणतीही माहिती नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारवाई झाली की नाही हे दुपारपर्यंत गुलदस्त्यातच होते. आज सकाळपासून अनेक व्हाट्सअप ग्रुपवर सीबीआयच्या पथकाने औरंगाबादेत छापेमारी केली व एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची पोस्ट फिरत … Read more

वीज पडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू; मका पेरताना घडली घटना

औरंगाबाद : जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजेदरम्यान वारा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून बाभुळगाव तरटे येथील 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 21 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. याच दरम्यान, लोहगड नांद्रा येथे वीज कोसळून सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. समृद्धी विष्णू तरटे (वय 18) असे ठार झालेल्या तरुणीचे … Read more

घाटीत महिलांसाठी 40 ऑक्सिजन खाटांच्या वॉर्डची निर्मिती

Collector

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने घाटीत जुन्या मेडिसिन विभागाच्या इमारतीत नवीन वॉर्डची निर्मिती होऊन वैद्यकीय सेवेस सुरुवात झाली. या वॉर्डचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. घाटीमध्ये मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होतात. त्यांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी या नवीन वॉर्डचा अधिक उपयोग होणार असल्याचा … Read more

मनपाला स्मार्ट सिटीचा विसर? अनेक ठिकाणी रखडली कामे

Smart city

औरंगाबाद | ‘स्मार्ट सिटीज मिशन’ हा भारत सरकारचा नागरी पुनर्नवीकरण आणि सुधारणा कार्यक्रम आहे.  केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये औरंगाबाद शहराची 2016 मध्ये निवड करण्यात आली होती. परंतु गेल्या पाच वर्षाच्या काळात या प्रकल्पामध्ये 500 कोटी रुपयांचे कामं अजून सुद्धा बाकी आहे.केंद्र आणि राज्य शासनाकडून आतापर्यंत 441 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातील 346 … Read more

लवकीनदीत आढळला नारायण महाराज यांचा मृतदेह; अपघात की घातपात अस्पष्ट

Drowing

औरंगाबाद | एका 45 वर्षीय महाराजाचे मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आल्याची घटना आज सकाळी लिंबेजळगाव येथील शनीमंदिर नजीकच्या लवकी नदी मध्ये समोर आली. नारायण महाराज असे मृताचे नाव आसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अधिक माहिती अशी की,आज सकाळी लिंबे जळगाव येथील शनिमंदिर जवळून वाहणाऱ्या लवकी नदी मध्ये नागरिकांना मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती प्राप्त होताच … Read more