दिलासादायक…! घाटी रुग्णालयात 12 व्हेंटिलेटरची वाढ

औरंगाबाद : जिल्हयासह शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे.  त्यामुळे ठिकठिकाणांहून दाखल होत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे घाटी रुग्णालयात व्याप जास्त असल्याने आरोग्य सुविधेत वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. पाहायला मिळत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात व्हेंटिलेटरच महत्व हेरून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे यांच्यात CSR फंड मधून 25 व्हेंटिलेटर … Read more

लसीच्या तुटवड्यामुळेच खासगी रुग्णालयांत लसीकरणावर परिणाम

औरंगाबाद : कोरोनाची साथ वाढत असतानाच शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमधील कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस बंद झाला आहे.  सध्या केवळ दुसराच डोस दिला जात आहे.  त्यामु‌ळे संबंधितांना पहिल्या डोससाठी सरकारी रुग्णालये आणि महापालिकेच्या केंद्रांवर पाठवले जात आहे. लसीच्या तुटवड्यामुळेच खासगी रुग्णालयांतील लसीकरणावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील डझनभर खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या थाटात आणि … Read more

युवतीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद :  वाढदिवसाच्या पार्टीत काढलेल्या फोटोवरून ब्लॅकमेल करत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी.  तारे यांनी या प्रकरणी आदेश दिले आहेत. शेख सरताज शेख आरीफ (२२, रा. छावणी) असे आरोपीचे नाव असून,  त्याला १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.  प्रकरणात २४ वर्षीय पीडितेने फिर्याद … Read more

कोरोना संकटात लसीकरण गरजेचे,  नागरिकांनी सहभाग घ्यावा

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध म्हणून लसीला संशोधकांनी मंजुरी दिली आहे.  त्यामुळे निःसंकोचपणे सर्वांनी लसीकरण करावे,  मी स्वतः लस घेतली असून आपण सहभाग नोंदवा,  असे विनम्र आवाहन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. औरंगाबादमधील जिल्हा व्यापारी केंद्राचे बालाजी मंदिर,  राजाबाजार लसीकरण केंद्र,  मनपाचे शाह बाजार लसीकरण केंद्र,  रोटरी क्लब व जैस्वाल महिला संघटनातर्फे … Read more

रेमडीसिवीरचा वापर मार्गदर्शक सूचनांसह खबरदारीपूर्वक करा

औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून त्या दृष्टीने प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या संचारबंदीच्या सुधारित वेळ मर्यादेचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.  जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या सुधारित वेळ मर्यादेच्या आदेशाच्या अंमलबजावणी बाबत नागरिकांना आवाहन करत असताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.  … Read more

औरंगाबाद -अहमदनगर रस्त्यावर गोदामाला लागली भीषण आग

औरंगाबाद : वाळूज महानगराजवळील औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यालगत असलेल्या रबराच्या गोदामाला रविवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली.  या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  या भीषण आगीने परिसरात खळबळ उडाली असून आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. यावेळी रस्त्यावर आगीचे लोळ या बाबत माहिती अशी की, रविवारी सायंकाळी रस्त्यालगत असलेल्या रबराच्या … Read more

कोरोनामुळे आंबा महोत्सव पुन्हा एकदा येणार अडचणीत

औरंगाबाद : शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून जाधववाडी येथे गेल्या चार वर्षापासून आयोजित केला जाणारा आंबा महोत्सव  यंदा कोरोनामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षीही कोरोनाच्या कहरामुळे हा महोत्सव रद्द करावा लागला होता.  यंदा परिस्थिती सामान्य झाली की,  1 मेनंतर आयोजनासाठी प्रयत्न केले जातील,  अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे … Read more

सावधान..! संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिराल तर…मोबाईल व्हॅन करणार कोविड टेस्ट

औरंगाबाद : जिल्ह्य़ात कोराना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदीत विनाकारण अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा, अन्यथा विनाकारण फिरणाऱ्यांची मुख्य चौकात मोबाईल व्हँनमध्ये कोविड-19 टेस्ट करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासन व पोलिस विभागाच्या सहाय्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हँनची नजर असणार आहे. संचारबंदीदरम्यान दररोज सकाळी … Read more

औरंगाबादमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनची चोरी करून विकणारी हाॅस्पीटलच्या कर्मचाऱ्यांची टोळी गजाआड

औरंगाबाद | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) रुग्णालयातून चोरी केलेले रेमडेसीविर इंजेक्शन विकणारी टोळी गजाआड करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घाटीच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांसह दोन मेडीकल चालकांना गजाआड करण्यात आले आहे. याबाबत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी … Read more

शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही बछड्यांना तिने जवळ घेतले नाही; आईचं प्रेम न मिळाल्याने अखेर झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील पिवळ्या भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचा बुधवारी रात्री साडेदहा वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. भक्ती वाघिणीची बछडे देण्याची ही पहिलीच वेळ होती. तिच्यामध्ये मातृत्व भावना दिसून आली नसल्याने वाघीण पिल्लांची काळजी घेत नव्हती. स्वतः दूध पाजत नव्हती त्यामुळे पिल्लास ठराविक अंतराने बकरीचे दूध पाजण्यात येत होते. परंतु 14 … Read more