नगरसेविकेला प्लास्टिक वापरल्यामुळे ५०० रुपयांचा दंड, आयुक्तांना गिफ्ट देणे पडले महागात

नवनियुक्त मनपा आयुक्तांना भेटायला गेलेल्या भाजप शिष्टमंडळातिल एका नगरसेविकेने मनपा आयुक्तांना प्लास्टिक रॅपरमध्ये पेन दिला होता. हा पेन प्लस्टिकच्या रॅपरमध्ये पॅक केला आहे. हे आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी या नगरसेविकेला ५०० रुपयांचा दंड केला आहे. मनीषा मुंढे असं या नागरसेविकेचं नाव आहे.

कुख्यात बॅग लिफ्टिंग गॅंग गजाआड, औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाची कारवाई

बँकेतून पैसे काढून बाहेर निघणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेऊन त्यांचे लाखो रुपये लंपास करणारी आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतील कुख्यात बॅग लिफ्टिंग गॅंग औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने पैठणमधून पकडली आहे. या टोळीने मागील अनेक महिन्यापासून धुमाकूळ घालत पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. शेवटी या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

औरंगाबादमध्ये हायप्रोफाईल कुंटणखान्यांवर गुन्हे शाखेचे छापे, १० जणांना अटक

शहरातील उच्चभ्रू वसाहतीमधील एका बंगल्यात आणि रो-हाऊस मध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेला हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांच्या टाकलेल्या धाडीत १० जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वेश्या अड्ड्यावर अटक करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये शहरातील प्रसिद्ध प्रोझोन मॉलच्या मॅनेजरचा समावेश देखील आहे. ही कारवाई बीड बायपास रस्त्यावरील उच्चभ्रू वसाहतीत करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमध्ये थकीत कर वसुलीसाठी जीएसटी कार्यालयाची यंत्रणा लागली कामाला,५० कोटी वसूल

जीएसटी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविली होती. ही योजना दोन टप्प्यांत राबविण्यात आली होती. या योजनेतून २ टप्प्यात केलेल्या करवसुलीत ५० कोटींचा कर वसूल झाला आहे. २०१० पासून थकीत करदात्यांकडून ही वसुली करण्यात जीएसटी कार्यालयास यश मिळाले आहे. यासाठी औरंगाबाद जीएसटी कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती तेव्हा ही वसुली करण्यात आली.  

आरटीओ कार्यालयातील कनिष्ठ महिला लिपिकने केला तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार

आरटीओ कार्यालयातील परिवहनेत्तर विभागात एका महिला लिपिकाने तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आरटीओ सतीष सदामते यांच्याकडे तक्रार दिली. विशेष म्हणजे, तक्रारीत कोणत्या वाहनांचा कर कसा बुडवण्यात आला, याची माहिती वाहन क्रमांकासह देण्यात आलेली आहे. असे असताना थेट कारवाई करण्याऐवजी चौकशीचा फार्स आरटीओ कार्यालयाने सुरु केलेला आहे.

वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने सेवानिवृत्तांची परवड, १२ हजार सेवानिवृत्त पेन्शनपासून वंचित

३० ते ३५ वर्षे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीचे पेन्शन वेळेवर मिळण्याच्या व उर्वरित आयुष्य सुखाने जगण्याच्या अनेक सेवानिवृत्तांच्या इच्छेला कोषागार विभागाच्या ढिम्म कारभारामुळे सुरुंग लागला आहे.  १२ हजार सेवानिवृत्त आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परवड सुरू आहे. सेवानिवृत्तांच्या वेतन पडताळणी संचिकांचा ढीग कोषागार विभागात पडून असून, ऑनलाईन व संचिका आवकीच्या ज्येष्ठतेनुसारच त्या तपासल्या जात आहेत. शासकीय सेवेची संधी मिळाल्यानंतर जो आनंद कर्मचाऱ्याच्या मनात रुजू होताना असतो, तेवढेच दु:ख आणि वेदना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येत आहे.

अखेर ३ वर्षीय आराध्याची प्राणज्योत मालवली; ६ दिवसांपासून सुरु होते उपचार

आराध्या हि घरातील अंगणामध्ये खेळत होती. त्यांच्या घरासमोर सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी चुलीवर ठेवलेले होते. पाणी उकळत असल्याने आराध्याच्या आईने ते पाण्याचे पातेले चुलीवरून उतरवत खाली ठेवले. आणि घरातील इतर कामे ती करु लागली

धुळे महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद कोर्टात; रोटेशनाचा क्रम चुकविल्याचा नगरसेवकांचा आरोप

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदाची माळ कोणाच्य गळ्यात पडणार यावरुन खलबते रंगली असतानाच, आता महापौरपदाच्या आरक्षणाचा वाद हायकोर्टात पोहचला आहे.

महिलांच्या मनातील भयमुक्त वातावरणासाठी निर्णय घ्या! औरंगाबादमधील तरुणाईचे पंतप्रधानांना पत्र

हैद्राबाद बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी सर्व स्तरातून समोर येत आहे. यावर आता शहरातील तरुणाईने सुद्धा कणखर भूमिका घेत देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे. अशा मागणीचे पत्र विद्यार्थ्यांनी थेट प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असेही म्हटले आहे. हे पत्र तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले आहे. हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे.

औरंगाबाद शहरात भरवस्तीत आढळला बिबट्या, वन विभागाकडून शोधाशोध सुरू

शहरातील एन-वन परिसरामध्ये आज पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला फिरताना पाहून सर्वच हादरुन गेले. एन-वन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील नागरिकांनी तात्काळ वनविभाग आणि पोलिसांना याविषयी माहिती दिली आहे. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काळ गणपती मंदिरा मागील गार्डनमध्ये सकाळी ९ पर्यंत युद्ध पातळीवर बिबट्याचा शोध सुरू केला जात होता.