धक्कादायक !!! महापालिका अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटी कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी कर्मचारी बाबू किसन करमळकर याचे भाऊ अभिजित किसन करमळकर (रा. खणभाग, सांगली) यांनी महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे व रघुवीर (काका) हलवाई यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, पाणीपुरवठा विभागात काम … Read more

मालवाहतूक गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत माहिती अधिकार कार्यकर्ता अन् नगरपालिकेचा कर्मचारी ठार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव-पलूस मार्गावर तासगाव नजीक एस मालवाहतूक या गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत तासगाव येथील दोन जण ठार व दोन जण जखमी झाले ही घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात माहिती अधिकार कार्यकर्ता समितीचे राहुलकुमार शिंदे व तासगाव नगरपरिषदेतील कर्मचारी दीपक स्वामी हे दोघे ठार झाले आहेत तर सचिन बाबर व छोटा … Read more

परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतप्त जमावाकडून रस्तारोको

परभणी प्रतिनिधी | परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाला अचानक आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने खांबावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात असणाऱ्या एकता नगर मध्ये घडली. याप्रकरणी सदरील युवकाच्या कुटुंबीयांना महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी यामागणीसाठी रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृत युवकाचा मृतदेह राष्ट्रीय … Read more

धक्कादायक ! पत्नीचा गळा दाबून शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | सततची नापीकी आणि कर्जाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात येणाऱ्या पुयनी येथे घडली आहे. रंगनाथ हरीभाऊ शिंदे वय ४५ , सविता रंगनाथ शिंदे वय ४० असे पुयनी येथील मृत पती पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत रंगनाथ … Read more

भरधाव बसची ओमानी कारला भीषण धडक, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

सांगली |  इस्लामपूर रोडवर आष्टा लायनर्स प्रा. लि. समोर ओमनी कार, एस.टी. बस व मोटारसायकल असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तिघे युवक रोहित रघुनाथ पाटील, अमर रघुनाथ पाटील व संस्कार अनिल पवार सर्व हे जखमी झाले आहेत. अपघात स्थळी आष्टा पोलीस तात्काळ दाखल झाले. एस. टी. बस क्रमांक ही इस्लामपूरहून सांगलीकडे चालली होती. … Read more

पिकअप टेम्पोची उसाच्या ट्रकला पाठीमागून धडक; 6 जणांचा मृत्यू

औरंगाबाद | लग्नावरून परत येणाऱ्या मंगरूळ येथिल कुटुंबावर काळाने घाला घातला असून पिकप टेम्पोने उभा उसाच्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री सिल्लोड शहराजवळील मोढा फाटा येथे घडली. सिल्लोड तालुक्यातील घाटशेंद्रा इथून लग्न लावून परत येत असताना हा भीषण अपघात झाला असून यात नवरदेवाच्या … Read more

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

सांगली । आटपाडी तालुक्यातल्या खरसुंडी येथे अंनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने तिघांच्या साथीने खून केल्याची धक्कादायक घटना उडाली आहे. सतिश उत्तम धुमाळ यांच्या डोळयातील गंभीर जखमी करून खून केल्याचे तपासत स्पष्ट झाले. चौघांनी साडीने सतिश उत्तम धुमाळ ( वय 32) यांचा मृतदेह घरात गळफास लावून मृत झाल्याचा बनाव केला होता. आटपाडी पोलिसांनी या घटनेची … Read more

‘त्या’ तिहेरी आत्महत्येचे गूढ अद्यापही कायम, मुलीच्या कुटुंबाकडे सापडली चिठ्ठी

सांगली । तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या प्रकरणाचे गूढ कायम आहे. सदरची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र एक तरुण आणि दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चा आहे. मात्र, मयत शिवानी चंद्रकांत घाडगे या हातीद येथील मुलीच्या घरी … Read more

दोन कारच्या भीषण अपघातात तरुण शास्त्रज्ञासह पत्नी जागीच ठार; गाड्यांचा झाला चक्काचुर

सांगली | विट्याहुन पुसेसावळीकडे जाणाऱ्या व तिकडून विट्याकडे येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघेजण ठार झाले. या अपघातात तरुण शास्त्रज्ञासह IT कंपनीत काम करणार्‍या पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कपिल माणिक झांबरे व त्यांची पत्नी धनश्री कपिल झांबरे (रा. डोंगरसोनी, ता. तासगाव) व सुदर्शन गजानन निकम … Read more

मित्रांच्या मारहाणीत भाजी विक्रेत्याचा झाला दुर्दैवी मृत्यू

death

सांगली | संजयनगर परिसरात असणाऱ्या लव्हली सर्कल जवळ मित्रांनी केलेल्या मारहाणीत भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. फिरोज शेअरली शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना हि बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने शेख याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा … Read more