दिल्लीतील हिंसाचार सोनिया गांधी यांच्या चिथावणीखोर वक्तव्याने- प्रकाश जावडेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्ली हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप केला. दिल्लीतील घडलेला हिंसाचार हा केवळ २ दिवसांचा नसून गेल्या २ महिन्यांपासून लोकांना भडकवण्याचा प्रयन्त केला जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना सोनिया गांधी यांनी २ महिन्यांपूर्वी रामलीला मैदानात केलेल्या भाषणात आर-पारची … Read more

दिल्ली हिंसाचार: काँग्रेस नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, अमित शहांना पदावरून हटवण्याची केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर करून आपला निषेध नोंदविला आहे. राष्ट्रपतींना निवेदन दिल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या , ”आम्ही नागरिकांचे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे.” यासह दिल्लीतील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी … Read more

दिल्ली हिंसाचारात ‘आप’मधील कोणीही सामील असेल त्याला दुप्पट शिक्षा द्या- केजरीवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या अनेक भागातील हिंसाचाराबाबत आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”आम आदमी पक्षाचा कोणताही नेता जर या दंगलीत सामील झालेला आढळला असेल तर त्याला दुप्पट शिक्षा द्या. आम आदमी पक्षाचे (आप) नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावर दिल्ली … Read more

दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी सरकारचीच- भैय्याजी जोशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या भीषण हिंसाचारावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश भैय्याजी जोशी यांनी महत्वाचं विधान केलं आहे. दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने दिल्लीची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे असं भैय्याजी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रातील भाजप सरकारची मार्गदर्शक संस्था असल्यानं जोशी यांचे विधान सूचक … Read more

दिल्ली हायकोर्ट म्हणाले.. कोर्ट आणि पोलिस असतांना 1984ची पुनरावृत्ती व्हायला नको

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून झालेल्या हिंसाचाराबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. कोर्ट आणि पोलिस असतांना आम्ही दिल्लीत आणखी 1984 पाहू शकत नाही असं दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केलं आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची वेळ आली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. लोकांच्या मनातील भीती घालून त्यांच्या मनात सुरक्षित असल्याची भावना … Read more

चिथाणीखोर विधान करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा! दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत दाखल केलेल्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत चिथाणीखोर विधाने करणार्‍या भाजप नेत्यांविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. Delhi violence matter in Delhi HC: Justice Muralidhar says we are surprised at the conduct … Read more

दिल्ली हिंसाचार: अखेर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडत नागरिकांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना शांती कायम राखण्याच आवाहन केलं आहे. आपल्या ट्विट मध्ये मोदी म्हणाले,”दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न … Read more

दिल्लीतील हिंसाचार: गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला नाल्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासून एकूण ४ मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. यात इंटेलिजन्स ब्युरो(आयबी) या गुप्तचर यंत्रणेच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. अंकित शर्मा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी अंकित यांचा मृतदेह चांदबाग परिसरातील एका नाल्यात आढळून … Read more

दिल्लीतील हिंसाचार आटोक्यात येत नसेल तर लष्कराला बोलवा- केजरीवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर प्रतिकिया दिली आहे. दिल्लीच्या हिंसा प्रभावित भागात सैन्य बोलावून कर्फ्यू लावावा यासंदर्भात आपण गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याविषयी ट्वीट “मी रात्रभर बर्‍याच लोकांशी संपर्क साधत आहे … परिस्थिती चिंताजनक आहे … सर्व प्रयत्न … Read more

CAAवरून दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा काल सोमवारी अहमदाबादमधून सुरू झाला. यानंतर त्यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. दरम्यान आज दिल्लीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानंतर ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना नागरिकत्व कायद्याबाबत आणि दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत केलेल्या प्रश्नांला … Read more