अ‍ॅमेझॉन करीत आहे कायद्याचे उल्लंघन, CAIT ने ईडीला पत्र लिहून केली कडक कारवाईची मागणी

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने रविवारी सांगितले की, त्यांनी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला (Enforcement Directorate) पत्र लिहून बाजाराच्या किंमतीसाठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अ‍ॅमेझॉनच्या (Amazon) बाजारपेठ बिघडवणाऱ्या किमतींमुळे छोट्या व्यापाऱ्यांची परिस्थिती ढासळत असल्याचा दावाही या पत्रात करण्यात आला आहे. कॅटने सांगितले की, त्यांनी अ‍ॅमेझॉनविरूद्ध सर्व … Read more

‘ईडी’चा कारनामा! १५ वर्षांत फक्त १४ प्रकरणांतच आरोप करू शकली सिद्ध

मुंबई । चौकशीचे शुक्लकाष्ठ ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालय. ‘ईडी’चा दरारा एवढा मोठा की, चौकशीसाठी बोलावणे आले की, समोरच्याच्या उरात धडकी भरते. अनेकांना घाम फुटतो. अलीकडच्या काळात विरोधांना छळण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हातातली ईडी’ म्हणजे ब्रम्हास्त्र असं म्हटलं जातं आहे. असे असले तरी गेल्या १५ वर्षांत ‘ईडी’ ला फक्त १४ प्रकरणांतच आरोप सिद्ध करून दाखविण्यात यश आले असल्याची … Read more

काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल ‘ईडी’ चौकशीच्या फेऱ्यात; ३ अधिकाऱ्यांचे पथक धडकले घरी

नवी दिल्ली । काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते अहमद पटेल सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) फेऱ्यात आले आहेत. संदेसरा समूहाच्या ५ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी ईडीचे पथक अचानक त्यांच्या घरी धडकले. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी ‘ईडी’च्या ३ अधिकाऱ्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल … Read more

प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी होणार! दाऊदच्या साथीदाराशी आर्थिक व्यवहार प्रकरण

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यावेळी ईडी चौकशीसाठी वर्णी लागली आहे ती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची. पटेल यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. ईडीच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला पटेल यांची चौकशी होणार आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यामुळं ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

‘ईडी’ चा शरद पवार यांना;मेल तूर्तास चौकशीची गरज नाही

मुंबई प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मेल पाठवण्यात आला असून तूर्तास चौकशीची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. दुपारी एक वाजता शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. शरद पवार यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून मेल … Read more