Moody’s कडून भारताच्या पतमानांकनात घट; तब्बल २२ वर्षांनंतर रेटिंगमध्ये घट

मुंबई । जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट केली आहे. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही. त्यामुळे कमी वृद्धीचा धोका काही काळ राहणार आहे. म्हणूनच मूडीजनं … Read more

मोदी सरकारचं पॅकेज फसवं; जीडीपीच्या १० टक्के नव्हे तर फक्त 0.91 टक्केच- पी. चिदंबरम

नवी दिल्ली । कोरोना संकटात लॉकडाऊनमुळं ठप्प पडलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मोदी सरकारनं मेगा आर्थिक पॅकेज जाहीर केलं. तब्बल 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज असल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलं. त्यावर सलग ५ दिवस पत्रकार परिषदांमधून घोषणांची सरबत्तीही झाली. मात्र, आज मोदी सरकारच्या 20 लाख कोटींच्या या पॅकेजवर आज काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केला. हे पॅकेज 20 … Read more

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार हेलिकॉप्टरने पैसे पडणार आहेत.पीआयबीने सोशल मीडियावरील या दाव्याची वस्तुस्थिती तपासली.एका टीव्ही शोफुटेजच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सरकार हेलिकॉप्टरद्वारे पैसे खाली पाडेल, असा खोटा प्रचार केला जात आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विंगने म्हटले आहे की सोशल … Read more

पाच वर्षात ५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणं अशक्य : सी. रंगराजन

आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था २.७ अब्ज डॉलर्सची आहे. पुढील पाच वर्षात आपण देशाची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्स करण्याच्या गोष्टी करत आहोत. हे लक्ष्य गाठण्यासाठी वार्षिक नऊ टक्के दरानं विकास होण्याची आवश्यकता आहे. अशातच २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्सची होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी व्यक्त केलं. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

सीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद पवारांकडूनही अकलूजच्या सभेत कानउघाडणी

“नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत असं भाजपनं ठरवून टाकलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आणायला हे एक प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही हे प्रभाकर यांनी खेदानं नमूद केलं. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर मनमोहन सिंग यांच्या मॉडेलचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही असं मतही प्रभाकर यांनी व्यक्त केलं.

आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर २.१ टक्क्यांवर

टीम, HELLO महाराष्ट्र | देशाचा आर्थिक विकासदर पाच टक्क्यांपर्यंत घसरल्याच्या पार्श्वभूमीवर आठ प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरात जुलैमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरणावर आधारित उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट व वीजनिर्मिती या आठ क्षेत्रांत गेल्या वर्षी जुलैमध्ये ७.३ टक्के उत्पादनवाढ नोंदविण्यात आली होती. ती यंदाच्या जुलैमध्ये २.१ टक्के इतकीच नोंदवण्यात आली, असे सरकारने सोमवारी … Read more

जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर , मोदी सरकारला मोठा झटका

टीम, HELLO महाराष्ट्र | देशात मंदी आहे पण ते मान्य करण्याचे धाडस मोदी सरकार करत नाही. मात्र, जागतिक मंदी असल्याचे सांगून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे, असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. परंतु देशात मंदी आहे. त्यातच आता आणखी एक चिंताजनक वृत्त हाती आले आहे. देशाचा जीडीपी वाढण्याऐवजी घटला आहे. त्यामुळे मोदी सरकारला मोठा … Read more