BREAKING NEWS : कोयना धरणाचे सहा दरवाजे उचलले, 10 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील कोयना धरणाची पाणी क्षमता 105 टीएमसी साठा असून आज 84 टीएमसी पाणीसाठा होता. धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज दि. 23 शुक्रवारी सकाळी 8 वाजता 10 हजार क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे, तर पावसाचा जोर असल्याने 10 वाजता हा विसर्ग वाढवून 25 हजार … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा : आमदार मकरंद पाटील यांच्या सूचना

महाबळेश्वर प्रतिनिधी। सकलेन मुलाणी दोन आठवड्यांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागातील विविध रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची आमदार मकरंद पाटील यांनी पाहणी केली. यावेळी या नुकसानीच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सुचना आमदार मकरंद पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना केल्या. दोन आठवडया पुर्वी 16 व 17 जुन रोजी महाबळेश्वर … Read more

कोयना धरणातून पाणी सोडले : नदीकाठच्या गावांना व्यवस्थापनाचा सतर्कतेचा इशारा

Koyna Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असुन धरणात व नदीपात्रात पाण्याची पातळी वाढू लागली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने शुक्रवारी सकाळी कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदी पात्रात 2100 क्युसेक्स पाणी विसर्ग केला आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने कोयना … Read more

मुंबई व उपनगरमध्ये पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आणि उपनगर परिसरात बरसत असलेल्या पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर येत्या 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस  बरसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने १३ व १४ जून या … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातल्या विविध जोरदार भागांमध्ये पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे काही भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिकं देखील भुईसपाट झाली आहेत. आज कोल्हापुरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान कोल्हापुरात भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील … Read more

सातारा जिल्ह्यात सरासरी 22.53 मि.मी.पावसाची नोंद, महाबळेश्वर, जावली, कराड व पाटण तालुक्यात जोरदार हजेरी

सातारा | जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटण आणि माण तालुका वगळता जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली पहायला मिळाली. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने व पावसाने मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे … Read more

सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटाचा पाऊस

सातारा | सातारा शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. दुपारीपर्यंत तापलेले वातावरण अवघ्या काही काळातच ढगाळ वातावरण होऊन झालेल्या पावसाने सातारा जिल्हावासियांना चिंब केले. गारपीटांच्या वळीव पावसाने रस्त्यांवर होती-नव्हती तीही वाहतूक बंद झाली. या सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी हानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सकाळी नऊपासून रकरकीत उन्हाने सातारा जिल्ह्यातील … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! येत्या २ दिवसांत नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणार

सोलापूर । निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. जून ते ऑक्टोबरदरम्यान नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 294 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास पाच लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांची खातेनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारपर्यंत पैसे जमा … Read more

संकटकाळी लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य -शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत असे पवार म्हणाले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे … Read more

अस्मानी संकटाचा कहर! मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेती पाण्याखाली; शेतकरी हवालदिल

औरंगाबाद । कोरड्या दुष्काळामुळं गेली काही वर्ष होरपळून निघालेल्या मराठवाड्यावर आता ओल्या दुष्काळाने थैमान घातलं आहे. राज्यासह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने चांगलाचं झोडपलं आहे. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. या अस्मानी संकटामुळं हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून … Read more