गलवान झडप: चीननं बंदी केलेल्या १० भारतीय सैनिकांची सुटका

वृत्तसंस्था । सोमवारी रात्री लडाखमधील गलवाल येथे चीनी सैन्याने हल्ला केल्यानंतर १० भारतीय जवान चीनच्या ताब्यात होते. मात्र, चर्चेनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेनंतर या सैनिकांना गुरुवारी सोडून देण्यात आले. या १० जवानांमध्ये ४ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. … Read more

मोदीजी उत्तर द्या! निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का धाडलं? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल मोदी सरकारला केला. सोबतच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली असा जाब … Read more

टिक-टॉकसह ‘या’ ५० चिनी ॲप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक; जाणून घ्या त्यांची नाव

नवी दिल्ली । भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टिकटॉकसह ५० चिनी ॲपचा वापर न करण्याचा इशारा भारत सरकार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. चीनचे हे ५० ऍप्स भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. या ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे … Read more

चीनला धडा शिकवण्यासाठी भारतात ‘चायनीज फूड’ बॅन करा! रामदास आठवलेंची मागणी

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. लडाखमधील भारत-चीन सीमेवर स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भारतातील सर्व चायनीज हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी चायनीज पदार्थांवर पूर्णपणे बंदी घालायला हवी. चायनीज … Read more

गलवानध्ये जे घडलं, ते तुम्ही ठरवून केलं; परराष्ट्रमंत्री एस.जयशंकरांनी चीनला सुनावलं

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर भारत आणि चीन यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आज पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. यासंघर्षाचं खापर भारतावर फोडणाऱ्या चीनला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. Wang Yi-S Jaishankar … Read more

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही! चीनला जशास तसं उत्तर देण्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील लडाखच्या गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसंच जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं पंतप्रधानांनी चीनला यावेळी ठणकावलं. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी … Read more

गलवान खोऱ्यांत चीनचे ३५ सैनिक ठार; अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा दावा

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये १५-१६ जूनच्या रात्री लडाखच्या Galwan Valley गलवान खोऱ्यात अतिशय हिंसक झडप झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले पण चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. चीनने अजूनपर्यंत हे मान्य केले नसले तरी यूएस न्यूज वेबसाइटने या संघर्षात ३५ चिनी सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये एका … Read more

भारत-चीन सीमा वादावर अमेरिका म्हणते, आम्ही लक्ष ठेवून आहोत!

वॉशिंग्टन । लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय त्याचे पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे. दरम्यान, हिंसक … Read more