जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही! चीनला जशास तसं उत्तर देण्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील लडाखच्या गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसंच जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं पंतप्रधानांनी चीनला यावेळी ठणकावलं. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी … Read more

गलवान खोऱ्यांतील जवानांच्या बलिदानाला अभिनेता विक्की कौशलने केला सलाम

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये १५-१६ जूनच्या रात्री लडाखच्या Galwan Valley गलवान खोऱ्यात अतिशय हिंसक झडप झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. भारतीय सैन्याच्या या बलिदानाला अभिनेता विक्की कौशलने ट्विटरवर सलाम करत आपल्या भावना व्यक्त केल्या. विक्की कौशलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “गलवान खोऱ्यात शूरपणे लढलेल्या आणि आपल्या राष्ट्राच्या गौरवासाठी … Read more

गलवान खोऱ्यांत चीनचे ३५ सैनिक ठार; अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा दावा

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये १५-१६ जूनच्या रात्री लडाखच्या Galwan Valley गलवान खोऱ्यात अतिशय हिंसक झडप झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले पण चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. चीनने अजूनपर्यंत हे मान्य केले नसले तरी यूएस न्यूज वेबसाइटने या संघर्षात ३५ चिनी सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये एका … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला हिंसक संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. त्यामुळं चीन सीमेवरील तणावाच्या परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. सीमेवर एकूणच युद्ध सदृश परिस्थिती आहे. देशाच्या सीमेवर नेमके काय सुरु आहे? त्याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत … Read more

चीन प्रकरणात पंतप्रधान देशापासून काय लपवत आहेत? राहुल गांधींचा मोदींना गंभीर सवाल

नवी दिल्ली । सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात अचानक हिंसक झडप झाली. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारच्या माहिती लपवा धोरणावर विरोधकांकडून टीका होत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेस … Read more

भारत-चीन सीमा वादावर अमेरिका म्हणते, आम्ही लक्ष ठेवून आहोत!

वॉशिंग्टन । लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय त्याचे पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे. दरम्यान, हिंसक … Read more

चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, भारतीय सैन्यानचं आधी हल्ला केला

लडाख । लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाल्याचं वृत्त मंगळवारी समोर आलं. या चकमकीमध्ये भारतीय सैन्यदलातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ज्यामध्ये दोन जवान आणि एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, ही बातमी उघडकीस येताच चीनने भारतावरच खळबळजनक आरोप केला आहे. ‘एएफपी न्यूज’चा … Read more