गलवान झडप: चीननं बंदी केलेल्या १० भारतीय सैनिकांची सुटका

वृत्तसंस्था । सोमवारी रात्री लडाखमधील गलवाल येथे चीनी सैन्याने हल्ला केल्यानंतर १० भारतीय जवान चीनच्या ताब्यात होते. मात्र, चर्चेनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेनंतर या सैनिकांना गुरुवारी सोडून देण्यात आले. या १० जवानांमध्ये ४ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. … Read more

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारणीला ट्रस्टकडून स्थगिती

अयोध्या । सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. भारत-चीन सीमेवरील या तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टनंही मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिर उभारणीचं काम तुर्तास थांबवण्यात येणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे आणि देशाचे संरक्षण करणे … Read more

शहीद जवानांचे कुटुंब आणि भारतीयांच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत; अमेरिकेचे सांत्वन

वृत्तसंस्था । सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. यात एका कमांडिंग ऑफिसरचा सुद्धा समावेश आहे. तर दुसरीकडे चिनी सैन्यालाही मोठं नुकसान झालं असून त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले असल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान, या हिंसक संघर्षानंतर अमेरिकेनंही आपली प्रतिक्रिया देत शहीद झालेल्या भारतीय जवानांचे … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे या ३ पक्षांना निमंत्रणच नाही

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान मोदी घेणार आज सर्वपक्षिय बैठक

नवी दिल्ली । चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. तप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली होती. … Read more

चीनला अद्दल घडवण्यासाठी एकदा आरपारची लढाई होऊन जाऊ द्या!- रामदास आठवले

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबतच्या संघर्षात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाल्यांनतर देशात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. चीनची आर्थिक कोंडी … Read more

मोदीजी उत्तर द्या! निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का धाडलं? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल मोदी सरकारला केला. सोबतच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली असा जाब … Read more

..म्हणून चीनने लपवला आपल्या मृत सैनिकांचा आकडा

पेईचिंग । भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. दरम्यान, काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारतीय सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. तणाव वाढवायचा नसल्यामुळे आकडा जाहीर करणार नसल्याचं चीनने म्हटलं आहे. पण आता चीनबाबत … Read more

टिक-टॉकसह ‘या’ ५० चिनी ॲप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक; जाणून घ्या त्यांची नाव

नवी दिल्ली । भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टिकटॉकसह ५० चिनी ॲपचा वापर न करण्याचा इशारा भारत सरकार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. चीनचे हे ५० ऍप्स भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. या ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे … Read more

चीनच्या ग्लोबल टाइम्सने भारताला दिला ‘हा’ फुकटचा सल्ला

वृत्तसंस्था । मागील काही दिवसापासून भारत-चीनमध्ये सीमावादवरून तणाव आहे. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांदरम्यान हिंसक संघर्ष झाला. या संघर्षामध्ये भारतीय सैन्यात २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे देखील जवळपास ४० सैनिक मारले गेले. त्यांनतर सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सीमेवर तणाव असाच वाढत राहिला तर भारताला चीन, पाकिस्तान आणि … Read more