कृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान

कराड | मलकापूर शहर हद्दीतील व कृष्णा हाॅस्पीटल समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील तीन दुकानांला आज मंगळवारी (दि. 4) दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. फ्रुट आणि ज्युसच्या लागलेल्या दुकानांची आग भडकल्याने शेजारील दोन बेकरीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. कराड- मलकापूर येथे प्रसिध्द असलेले कृष्णा हाॅस्पीटल समोर आज दुपारी … Read more

कोळेवाडी शाळेच्या शिक्षिका शोभा चव्हाण यांचा सन्मान

कराड | कोळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षिका श्रीमती शोभाताई अरुण चव्हाण यांना ‘रोटरी क्लब ऑफ मलकापूर’ यांच्या वतीने दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्ड – 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत सोमवार दि. 12 सप्टेंबर रोजी हा शिक्षक सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व शिल्ड असे … Read more

धक्कादायक ! बुलडाण्यात सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Sucide

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Sucide) केली आहे. या विवाहितेला सासरची लोकं तुला मूल जन्माला येत नाही म्हणून दोष देत होते. तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही, असं म्हणून वारंवार महिलेला त्रास दिला जात होता. या महिलेच्या पतीसह सासरचे … Read more

मलकापूरला मळाई ग्रुपच्या शिबिरात 340 जणांचे रक्तदान

कराड | श्री मळाई देवी शिक्षण संस्था, श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था व विज्ञान प्रबोधिनी कराड यांचे संयुक्त विद्यमाने आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेज मलकापूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 340 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन लक्ष्मीनारायण सरलाया, प्रवीण परमार यांच्या शुभहस्ते व अशोकराव थोरात, … Read more

कराड पोलिस ठाण्यावर शेकडोचा मोर्चा : मलकापूरातील गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी

कराड | लहान मुलांमधील भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या कारणावरून काल चौघांनी एका तरुणावर मलकापूर फाटा येथे धारदार शस्त्राने भरदिवसा वार केले. यामध्ये विश्वास येडगे हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संशयित हल्लेखोर हे वारंवार शहरात दहशत माजवत आहेत. त्यासाठी पोलिसांनी त्यांच्यासह मलकापूरातील गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मलकापूर येथील धनगर … Read more

मलकापूर फाट्यावर एका तरूणाला भोकसले : पाचही हल्लेखोर फरार

कराड | मलकापूर फाटा (ता. कराड) येथे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास हणमंत येडगे (रा. अहिल्यानगर, मलकापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लहान मुलांच्या कारणावरून मंगळवारी … Read more

मलकापुरात सख्ख्या मुलीने केली जन्मदात्या वडिलांची हत्या

Murder

मलकापूर : हॅलो महाराष्ट्र – मालकापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सख्खी मुलगी व पुतण्याने संगनमताने छातीत सुरा खुपसून आपल्या 52 वर्षीय वडिलांची हत्या केली आहे. सुभाषचंद्र बोस नगरमध्ये बुधवारी रात्री ९च्या सुमारास हि घटना घडली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीचे नाव गुलाब यादवराव … Read more

मलकापूर येथील कन्याशाळेत यशस्वी विद्यार्थींनी, पालकांचा सत्कार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूर एसएससी परीक्षेतील, एन.एम.एम.एस व शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थींनी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमास भास्करराव मोहिते, उद्योजक दिलीप पाटील, संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, अनिल शिर्के, अरूणा कुंभार, जीवन मोहिरे, प्रकाश पाटील, प्रमिला शेलार, … Read more

चालकाचा ताबा सुटला : मलकापूर हद्दीत चारचाकी गाडीचा अपघात ; तिघेजण जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील मलकापूर हद्दीत पुणे-बंगळूर महामार्गावर नटराज टॉकीज हद्दीत चालकाचा गाडी चालवताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात झाला. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यात तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात गाडीमधील चालक सागर वसंत शिंदे (वय 30), भरत अनुते (वय 38) कृष्णा काशिनाथ कगदे (वय 38) … Read more

अपार्टमेंटमध्ये गुपचूप सुरु होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकून केला भांडाफोड

Sex Racket

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोलामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अकोला शहरातील एका इमारतीमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी याची खातरजमा करून त्या ठिकाणी छापा टाकला. हे सेक्स रॅकेट अकोला शहरातील मलकापूर परिसरात होते. काय आहे संपूर्ण प्रकरण मलकापूर परिसरातील साई अपार्टमेंटमधील एका खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची टीप … Read more