देश कठीण प्रसंगातून जात आहे – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : ‘सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. देश कठीण प्रसंगातून जात आहे आणि आपण शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संवैधानिक घोषित करून सर्व राज्यांना या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती वकील विनीत … Read more

धर्मकारण वेगळे आणि राजकारण वेगळे; मंत्री झाल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडे भगवान गडावर

बीड : हा गड भगवानबाबांनी निर्माण केला आहे, इथे गडापेक्षा कोणीही मोठे नाही, भगवानबाबापेक्षा कोणीही मोठे नाही. धर्मकारण वेगळे आणि राजकारण वेगळे. हीच माझी श्रद्धा आहे, अशा भावना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रथमच भगवान गडावर जाऊन भगवान बाबांचे दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी गडावर … Read more

जंगलात लागलेली आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्याचा मृत्यू; ऑस्ट्रेलियातील चिमुरडीचा फोटो होतो व्हायरल

  कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीमध्ये अनेक प्राणी मृत्युमुखी पडले. ही आग विझविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील अग्निशमन दिल्याने शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर पावसाची साथ मिळाली आणि आग विझली. मात्र ही आग विझवताना अग्निशमनच्या दलातील कर्मचाऱ्याला प्राण गमवावे लागले. आग विझवतना झाड पडल्यामुळे अँड्र्यू ऑडॉयर या फायर फायटर मॅनचा मृत्यू झाला. त्यांच्या या मृत्यूनंतर त्यांच्या … Read more

दीपिकाचा ‘छपाक’ मध्यप्रदेशमध्ये टॅक्स फ्री

इंदौर : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपट मध्यप्रदेश राज्यामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. छपाक हा चित्रपट उद्या १० जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. मध्यप्रदेशमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे. छपाक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याविषयी … Read more

मला कोणत्याच जिल्हयाचे पालकमंत्री पद नको – बाळासाहेब थोरात

मुंबई : काल पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र मला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद नको अशी भूमिका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पालकमंत्री पदाचे वाटप होण्यापूर्वी देखील त्यांनी हे मत व्यक्त केले होते. कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती … Read more

ट्रोलिंगपासून बचावासाठी ट्विटरचे नवीन फिचर; ट्विटर युजर्सना दिलासा,पहा काय आहे फिचर

टीम हॅलो महाराष्ट्र : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या फीचरद्वारे युजर्स त्यांच्या कोणत्याही पोस्टवर येणारा प्रतिसाद नियंत्रित करण्यास सक्षम असतील. म्हणजेच, आता आपण आपल्या पोस्टवर कोण प्रत्युत्तर देऊ शकेल हे आपल्याला ठरवता येईल. या फीचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे युजर्स ट्रोलर्सवर नियंत्रण ठेवू शकतील. हे नवीन वैशिष्ट्य आणण्यापूर्वी कंपनी … Read more

बेरोजगारांसाठी खूशखबर ! स्टेट बँकेत ८ हजार जागांसाठी भरती

टीम हॅलो महाराष्ट्र : बेरोजगाराची समस्येने चिंताग्रस्त असणाऱ्या तरुणाईसाठी खुशखबर आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेत क्लर्क पदासाठी ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ८६५ जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर २ … Read more

बच्चू कडू यांच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे दिले होते आदेश

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल पाहिल्याच दिवशी दर्यापूर तहसील कार्याला भेट देत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत दोन तहसीलदारांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले होते. नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक प्रमोद काळे आणि सपना भोवते यांच्यावर ही कारवाई केली होती. बच्चू कडू यांच्या या निर्णयानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. … Read more

ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यासाठी अमित शहा शिकत आहेत ‘बंगाली’ भाषा

नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 ची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत ते बंगाली (बांगला) भाषा शिकत आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार करताना भाषा हा अडथळा आणू इच्छित नाही. बंगालमध्ये निवडणूक अभियान सुरू होईल तेव्हा अमित शहा बंगाली भाषेत आपले भाषण देतील आणि भाषेच्या अडथळ्याशिवाय … Read more

मोठी बातमी: प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही; महाराष्ट्र व बंगालचा प्रस्ताव फेटाळला

नवी दिल्ली : या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. या वर्षीच्या संचलनासाठी महाराष्ट्राने मराठी रंगभूमीची १२५ वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ पश्चिम बंगालचाही प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम … Read more