संताची नाही ही तर नराधमांची भूमी सुमित राघवन संतापला

मुंबई । पालघर जिल्ह्यात काही लोकांनी तीन प्रवाशांना चोर समजून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर ही संतांची नाही तर नराधमांची भूमी आहे. अस म्हणत अभिनेता सुमीत राघवन प्रचंड संतापला आहे. त्याने याबद्दल मीडियावर प्रखर प्रतिक्रियाही दिली. ‘मी सुन्न झालोय. जे घडलं ते अत्यंत भीषण, भीतिदायक, लाजिरवाणं आहे. अस ट्विट त्याने केल … Read more

पालघर जमाव हत्येप्रकरणी २ पोलीस अधिकारी निलंबित

Palghar Lynching Case

मुंबई । पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाने ३ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामध्ये कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली … Read more

पालघरमध्ये ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? २ साधूंच्या हत्येमागे धार्मिक कारण आहे का?

Palghar Lynching Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रात्री दोन साधूंना जमाव मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडयावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ पालघर येथील असून त्याला काहींच्याकडून धार्मिक रंग चढवण्याचा प्रयत्न झाला. जस्टीस फॉर साधुज असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला असल्याने अनेकांना पालघर मध्ये नक्की काय घडले असा प्रश्न पडला. हॅलो महाराष्ट्राच्या टीमने सदर प्रकरणाच्या काही महत्वाच्या बाजूंचा अभ्यास … Read more

अल्पवयीन मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इसमावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे एका मतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पालघरमधील सर्व गावांचा समावेश

प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत पालघर तालुक्यातील सर्व गावांचा समावेश गृहनिर्माण विभागाने केला आहे. त्यामुळं नव्याने बांधल्या गेलेल्या गृहसंकुलातील सदनिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबत निर्णय घेत शासनाने या योजनेत पालघरच्या समावेश करण्याचा निर्णय दिनांक १ नोव्हेंबर २०१९ घेतला होता. त्यानुसार संपूर्ण पालघर तालुक्याला या योजनेत समाविष्ट करत योजनेतील लाभांपासून वगळण्यात आलेल्या बोईसर, उमरोळी, सफाळे इत्यादी भागांमध्ये सदनिका विकत घेतलेल्या आणि अनुदानापासून वंचित झालेल्या सुमारे ४ हजार नागरिकांना आता दिलासा मिळताना दिसत आहे.

पोलीस पाटलाकडून आदिवासी महिलांची छेड

ग्रामीण भागात कायदा व सुव्यस्था अबाधीत रहावी यासाठी पोलीस पाटील म्हणून एखाद्याची नेमणूक करण्यात येते. पण ज्याची नेमणूक करण्यात येते त्यानेच आदिवासी महिलांची छेड काढल्याची खळबळजनक घटना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात घडली आहे.

पालघर जिल्ह्यात सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्यात एकूण एकूण-19 लाख 51 हजार 668 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील नालासोपारा विधान सभेत 2 लाख 86 हजार 4 पुरुष, तर 2 लाख 33 हजार 20 स्त्रिया आणि  इतर- 58 असे  एकूण-5 लाख 19 हजार 82 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पालघरमध्ये निवडणुकी आधीच मोठी उलथापालथ !माजी मंत्री मनीषा निमकर यांचा भाजपात प्रवेश

शिवसेना पक्षातून पालघर मतदारसंघात हॅट्रिक साधलेल्या पालघरच्या माजी आमदार व राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जव्हार येथील प्रचारसभेत हा पक्षप्रवेश पार पडला.

धक्कादायक !! पोलीस ठाण्यातच केली मेव्हण्याने जावयाची हत्या

आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या संशयावरून भावाने आपल्या जावयाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश कोळेकर असे मयत जावयाचे नाव असून रवींद्र उर्फ योगेश असे आरोपी मेव्हण्याचे नाव आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यातच घडली.

शिवसेनेकडून पालघरमध्ये सोशल इंजिनिअरींग; आदिवासी, वंचित घटकांना प्राधान्य

पालघर प्रतिनिधी। पालघर विधानसभेसाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन सोशल इंजिनिअरिंगचा खेळ खेळला आहे. आदिवासीबहुल पट्टा म्हणून पालघरची ओळख आहे. अशा परिसरात आदिवासी घटकाला उमेदवारी देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिलेला शब्द पाळला आहे. आदिवासी समुदायाचा मोठा ताफा सोबत बाळगत वनगा यांनी काल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. आदिवासी पारंपरिक नृत्य करत … Read more