भारत दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार- मुख्यमंत्री रुपानी

येत्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ट्रम्प पंतप्रधान मोदींबरोबर गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी दिली. उत्तर दिल्लीत शास्त्री नगरमध्ये निवडणूक प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

मोदी मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करत आहेत – उद्योगपती जॉर्ज सोरोस

नुकतच ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध मासिकाने आपल्या नव्या आवृत्तीत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. या आवृत्तीतील सर्वांत प्रदीर्घ लेख, ‘नेता’ हा अधिक जहरी आणि चर्चेचा विषय आहे. त्यात असे लिहिले आहे की, “पंतप्रधान मोदींमुळे 20 कोटी मुस्लिम घाबरले आहेत कारण पंतप्रधान हिंदू राष्ट्र बनविण्यात व्यस्त आहेत.” असं सांगितलं आहे.

मोदीसाहेब नमस्कार, रोहित पवार बोलतोय…नाव ऐकलंच असेल

संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात ‘सवांद तरुणाईशी’ कार्यक्रमात दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी महाराष्ट्रातील तरुण आमदारांची ही मुलाखत घेतली.

मोदी, शहा, डोवाल यांच्या जीवाला धोका? साध्वी प्रज्ञासिंहने केला दावा

राज्यकर्त्यांविरुद्ध देशभरातून नाराजीचा सूर उमटत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या फोटोवर फुली मारलेलं पत्र साध्वी प्रज्ञासिंह यांच्यापर्यंत पोहचवण्यात आलं आहे. या पत्रामध्ये योगी आदित्यनाथ आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचे फोटोही पहायला मिळत आहेत. या पत्रासोबतच पावडरसारखा पदार्थही लिफाफ्यात आढळून आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर काँग्रेसने लगावला टोला

राज्यातील इंटरनेट सेवा बंद असतांना देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ट्विटरवरून आसामच्या जनतेला शांततेत आवाहन केलं आहे. नेमकं याच मुद्द्याला धरून काँग्रेसने मोदींना ट्विटरवर कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केला.

नोबेल विजेते मुखर्जींनी घेतली मोदींची भेट, विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या भेटीची माहिती दिली. तसेच अभिजीत मुखर्जी यांच्यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचेही पंतप्रधानांनी म्हटलं.

साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी

‘साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.

मोदींची ऐतिहासिक घोषणा !

शेतमजूर, रस्तेकाम करणारे मजूर, घरकाम करणाऱ्यांना ३ हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन मिळणार असल्याचे मोदींनी जाहीर केले. राज्यातील निवडणुका पाहता मोदींनी केलेली घोषणा राजकीय दृष्टया ऐतिहासिक आहे. ही घोषणा सत्यात आल्यास राज्यातील शेतमजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या घोषणेचा परिणाम राज्यात भाजपाला मताधिक्य मिळवून देण्यासाठी होतो का हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिले आहे. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे. राज्यात कलम ३७०वरुन विरोधकांनी भाजपाला टार्गेट केल्यानंतर मोदी या मुद्दावरुन आक्रमक झाले आहेत. अकोला येथे महायुतीच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते.

विदर्भात निवडणुकांचं रान तापवण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज; अकोल्यात आज भव्य सभा

पश्चिम विदर्भातील भाजप सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकोल्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.