सातारा शहरात मुख्य रस्त्यावर भगदाड, सर्वत्र पाणीच पाणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडईच्या समोर मेन रस्त्याला मोठे भगदाड पडून रस्ता खचला आहे. रस्त्याला भगदाड पडल्याने प्रतापसिंह भाजी मंडईत पाणीच पाणी साठले होते. यामुळे प्रवाशी व भाजी मंडईतील ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पोवाई नाका ते एसटी बसस्थानक दरम्यान असलेल्या तहसिलदार कार्यालयासमोरील रस्त्यांवर हे भगदाड पडलेले आहे. … Read more

ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार : सातारा शहरात सात वाहने उडवली आणि…

सातारा | 31 डिंसेबर सेलिब्रिशेनला अजून तीन दिवस बाकी असताना. सातारा शहरात मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने तब्बल 7 गाड्यांना धडक दिली आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या थरारक ड्रंक अँड ड्राइव्हचा सीन पहायला मिळाल. त्यानंतर मात्र सातारकरांनी या मद्यधुंद चालकाला चांगलाच चोपला आहे. या अपघातात चारचाकी चार गाड्या आणि तीन दुचाकींना उडवल्यानंतर ही कार अखेर झाडावर … Read more

सातारा शहर आणि हद्दवाढीतील विकासकामांसाठी 1 कोटी निधी : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा | सातारा पालिकेत सत्ता असो वा नसो, सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारा शहरात सातत्याने असंख्य विकासकामे मार्गी लावणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहर आणि हद्दवाढीत समाविष्ट शाहूपुरी, शाहूनगर, गोळीबार आदी भागातील 13 विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून 1 कोटी 6 हजार 88 रुपयांचा … Read more

साताऱ्यातील ऐतिहासिक मंगळवार तळ्यात मृत माशांचा खच

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अवकाळी पावसाचा फटका साताऱ्यात चांगलाच बसलेला आहे. या पावसामुळे वाई तालुक्यात शेळ्या तर खटाव तालुक्यात मेंढ्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत. तर सातारा शहरातील ऐतिहासिक मंगळवार तळ्यात मृत माशांचा खच पडला आहे. मात्र याबाबत दूषित पाणी आणि अवकाळी पाऊस याचा परिणामामुळे मृत पडल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सातारा शहरातील ऐतिहासिक मंगळवार … Read more

सातारा शहरात घरगुती वादातून मुलाकडून वडिलांचा खून

Crime D

सातारा | किरकोळ कारणातून घरगुती वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या मुलाने वडिलांना मारहाण करत धारदार चाकूसारख्या हत्याराने भोसकल्याने वडिलांचा मृत्यू झाला आहे. सातारा शहरातील मंगळवार पेठेत ही घटना घडली असून मुलावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बबन पांडुरंग पवार (वय- 56, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सूरज पवार (वय- 28) … Read more

सातारा शहरातील “या” भागात शिरला बिबट्या, वन विभागाची शोध मोहिम सुरू

सातारा | सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरात बिबट्या असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर सोमवारी दि. 30 रोजी रात्री वन विभागाच्‍या पथकाने शोध मोहिम राबविली आहे. रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासह शेजारील संपूर्ण परिसर पिंजून काढत त्‍याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र अंधार, पावसामुळे वन विभागाने राबविलेल्‍या शोध मोहिमेत अडचणी येत होत्‍या. रात्री दहापर्यंत विविध ठिकाणी शोध घेतल्‍यानंतरही बिबट्याचा मागमूस लागू … Read more

गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापणे गुंडाच्या अंगलट, 12 जणांवर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके साताऱ्यातील चंदननगर येथील गुंड वैभव जाधव याने तलवारीने केक कापून वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. 15 ते 20 जणांनी जोरजोरात गाणी लावून रस्त्यावर केला नाचगाणे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित वैभव चंद्रकांत जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सातारा शहरात रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत गाडीच्या बोनेटवर बसून कापला तलवारीने केक कापला … Read more

साताऱ्यात गर्दीचा महापूर; दुचाकीसह चारचाकी वाहनांची गर्दी

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके वाढत्या कोरोनामुळे राज्य शासनाने चारचाकी वाहनातून प्रवास करण्यावर प्रवाशांना काहीसे निर्बंध घातलेले आहेत. मात्र त्याचे प्रवाशांकडून वारंवार उल्लंघन होत असल्याचा प्रकार सातारा शहरात घडत आहे. एकीकडे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सातारा शहरात बुधवारी तब्बल ९७० जणांचे अहवाल हे कोरोना … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात तब्बल ३०८ पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना काही दिवसापूर्वी आटोक्यात आले असे वाटत असतानाच मंगळवारी (दि 16) कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात काही दिवसापासून आटोक्यात असणाऱ्या कोरोनाचे तब्बल एका दिवसात 308 जण बाधित आढळले आहेत. सातारा जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र मार्च महिन्यात हे … Read more

वाळूच्या कारणातून झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा खून, तीनजण जखमी माण तालुक्यातील नरवणे येथील घटना

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नरवणे (ता. माण) येथे बुधवारी वाळूच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोघांचा खून करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत नाथा जाधव आणि विलास धोंडिबा जाधव अशी मारहाणीत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत आणखी तीन गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले … Read more