भिलार ग्रामपंचायतीसमोरच स्थानिक धनदांडगा बेकायदा उत्खनन करतो; तलाठी मात्र उत्खननाची राखण करतो

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील अस्तित्वहीन महसुल प्रशासनामुळे स्थानिक धनदांडग्यांनी राजकीय अन सामाजिक संस्थांची बिरुदं वापरुन ‘नाम बडे दर्शन खोटे’ करत भिलार ग्रामपंचायतीसमोर सर्वे नंबर ५६ मध्ये बेकायदा उत्खननाचं भलं मोठ भगदाड पाडलं आहे. ग्रामपंचायतीच्या समोर हाकेच्या अंतरावरील तलाठी कार्यालयाशेजारी बेकायदा उत्खनन सुरु असताना तलाठी मात्र स्थानिकांच्या बेकायदा उत्खननाची राखण करत असल्याची अशी दयनीय अवस्था … Read more

पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची तडकाफडकी बदली

suraj gurav

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मागील वर्षभरात कणखर भूमिका घेत कराडच्या गुन्हेगारी विश्‍वाच्या मुसक्या आवळणार्‍या कराडचे पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची गुरुवारी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. सुरज गुरव यांनी कराडचा पदभार स्वीकारून नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. अचानक बदली झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले असून या बदलीस ‘मॅट’मध्ये आव्हान दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत … Read more

सातारा जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु – जिल्हाधिकारी शेखर सिंह

shekhar singh

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात उद्या पासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु होईल अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. यामुळे आता कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत याची माहिती रुग्णांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. रेमडीसीव्हर इंजेक्शन आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महत्वपूर्ण निवेदन केले यावेळी … Read more

कराडकरांसाठी अभिमानाची गोष्ट! कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 2 हजार कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

krushna hospital

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 2000 हून अधिक कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्ज देण्यात आला असून, येथे कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 32 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 2006 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या … Read more

धक्कादायक !! ब्लॅकमेल करून महिलेने डॉक्टरकडे मागितले तब्बल 60 लाख

crime

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील एका डॉक्टरला महिलेने ब्लॅकमेल करून तब्बल 60 लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यासंबंधी दोन संशयित महिलांना तपासासाठी पुण्याला घेऊन पोलीस रवाना झाले आहेत. या महिलांनी अनेकांना अशा प्रकारे गंडा घालून लाखो रुपये उकळल्याचे तपासात समोर येत आहे. फोन करून त्या बड्या व्यक्तींना जाळ्यात ओढायच्या. प्राची उर्फ … Read more

सर्व आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेच्या आधारे आरक्षण द्या ; उदयनराजेंची मागणी

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक असताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केले आहे. समाजातील सर्व आरक्षण रद्द करा आणि गुणवत्ते नुसार आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत उदयनराजे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळूनही प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना … Read more

दापवडीच्या हातगेघर पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना शासनाची फसवणुकीबाबत नोटीस; आकाश रांजणेंकडून दापवडीतील ठग धरणग्रस्तांची पोलखोल

सातारा प्रतिनिधी | जावळी तालुक्यातील दापवडी येथील “हरी के लाल” म्हणुन नावलैाकीक असलेल्या हातगेघर पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांनी ठगगिरी करत शासनाकडुन उदारनिर्वाह भत्ता घेवुनदेखील पुन्हा उदारनिर्वाह भत्ता लाटला असल्याची धक्कादायक पोलखोल आकाश रांजणे यांनी केली आहे. या प्रकारानंतर सहाय्यक कार्यकारी अभियंता, कृष्णानगर यांनी दापवडी सरपंचाना नोटीस काढत उदरनिर्वाह भत्ता १ लाख ५८ हजार ८०० रुपये परत भरण्याचे … Read more

आशा सेविका व गट प्रवर्तक यांचे प्रश्न मार्गी लावणार – संजुबाबा गायकवाड

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील सर्व आशा सेविका व गट प्रवर्तक यांनी पंचायत समितीच्या आवारात निदर्शने करून त्यांच्या समस्या निवेदन देऊन मांडल्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत करावयाच्या कामामध्ये असणाऱ्या जबाबदाऱ्या व मिळणारे मानधन यांच्याविषयी आशा सेविका संघटनेने उपसभापती संजुबाबा गायकवाड यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी चर्चेतून समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कटिबद्ध … Read more

कराड शहर पोलिसांकडून चोरीच्या 7 दुचाकी जप्त, 4 जण ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी गाडी चोरी झाल्याची घटना घडली होती. त्याचा तपास चालू असताना गोपनीय खबऱ्याकडून चोरी झालेल्या गाडीची माहीती मिळाली. खबऱ्यांकडून माहीती मिळाल्यानंतर एकाला ताब्यात घेतल्यानंतर आणखी तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. तसेच या चौघांकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरीची गाडी विकण्यासाठी आरोपींच्याकडून शक्कल लढविली जात … Read more

पोलिस अधिकार्‍यांनी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला? पहा काय म्हणतायत शंभुराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काही पोलीस अधिकारी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं धक्कादायक वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. अस देशमुख म्हणाले होते. यावर आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आपले मत … Read more