पाटण तालुक्यातील 94 पाणी पुरवठा योजनांना निधी : खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

MP Shrinivas Patil

कराड | खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील म्हावशी, जिंती, सडावाघापूर, चाफळ यासह एकूण ९४ गावातील पाणी पुरवठा योजनांना मंजूरी मिळालेली आहे. सदर गावातील पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध झाल्याने त्या कामांना गती मिळणार आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडून कसोशीने प्रयत्न … Read more

कराडात लोकवर्गणीतून पहिली स्वतंत्र ट्रेकिंग इन्स्टिट्यूट उभारणार: खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  आजच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या युगात युवा पिढीमध्ये चंगळवादी संस्कृती वाढत आहे. त्यामुळे कराडसह तालुक्यात एक चांगली युवा पिढी तयार व्हावी, यासाठी लोकवर्गणीतून पहिली स्वतंत्र ट्रेकिंग इन्स्टिट्यूट उभारण्याचा संकल्प खासदार श्रीनिवास पाटील यांनी जाहीर केला आहे. मागील 30 वर्षापासून दुर्ग संवर्धनासह सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या कराडमधील प्रीतिसंगम सायकल ग्रुपचे संस्थापक दिपक … Read more

बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत : श्रीनिवास पाटील

Srinivas Patil Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथे खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत विविध कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र व धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व बँकांनी अर्थ सहाय्याच्या योजना दारोदारी पोहचवून सर्वसामान्य नागरिकांना उद्योग उभारणीसाठी व त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी जास्तीत जास्त … Read more

वारसा माणुसकीचा : रूग्णवाहिका नाही म्हणताच खासदार पुत्र थेट रूग्णालयात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील हे नेहमीच लोकांच्यात मिळून मिसळून काम करताना अनेकदा दिसत असतात. श्रीनिवास पाटील यांच्याप्रमाणे त्यांचे पुत्र सारंग श्रीनिवास पाटील हे पण आता वडिलांचा माणुसकीचा वारसा पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. सारंग पाटील वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून समाजकार्यात नेहमीच काम करताना दिसत असतात. गुरूवारी कराड- … Read more

सातारा लोकसभा मतदार संघासाठी 26 कोटी 64 लाखांचा निधी : खा. श्रीनिवास पाटील

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत सातारा लोकसभा मतदार संघातील 35 गावातील अस्तीत्वातील नळ पाणी पुरवठा योजनांना सुधारणात्मक पुर्नजोडणी करणे कामांसाठी 26 कोटी 63 लक्ष 75 हजाराचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. खा. पाटील यांच्या प्रयत्नातून सदर गावांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याने येथील नळ पाणी पुरवठा योजनांच्या … Read more

आनेवाडी, खेडशिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमध्ये सवलत द्यावी : खा. श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil

सातारा | लोकसभेत खा. श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा आवाज उठवत सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. पाटण, कराड येथील पूलांची कामे लवकर पूर्ण करावीत. आनेवाडी, खेडशिवापूर टोलनाका परिसरातील स्थानिकांना टोलमध्ये सवलत द्यावी. वेळे येथे रस्ता ओलंडण्यासाठी नवीन पूल बांधावा. महामार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरू करावेत. तसेच मार्गाच्या कामाचा दर्जा सुधारावा … Read more

प्रीतिसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल व सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, यशवंतराव … Read more

“सातारच्या लेकीने मोठं व्हावं”; श्रीनिवास पाटील यांचे गौरवोद्गार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा येथील सनबीम आयटी पार्कमध्ये श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला ‘ती’ चा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कला, क्रीडासह विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महिलांचा ‘आदिशक्ती पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी “सातारा जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकीने प्रत्येक क्षेत्रात मोठी झेप घ्यावी. … Read more

“खचून जाऊ नका, तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो” – खासदार श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या चार दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. दरडी कोसळून माणसे गाडली गेली आहेत. शेती शिवार उभ्या पिकांसह वाहून गेली आहेत. या दरम्यान दिल्लीत अधिवेशनाला उपस्थित असलेले खासदार श्रीनिवास पाटील परत आल्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा … Read more

महाबळेश्वर तालुक्यातील 113 पैकी 85 गावे अद्यापही संपर्कहीन

महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सातारा, सांगलीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, पाटण व जावळी तालुक्यातील काही गावांना आतापर्यंत भूस्खलन व पुराचा चांगलाच फटका त्यात महाबळेश्वर तालुक्यातील 113 गावांपैकी 85 गावे अद्यापही संपर्कहीन आहेत. त्या ठिकाणी या गावात दळणवळण सुरु करणे व रस्ते करण्यासंदर्भात सातारा येथे खासदार … Read more