लग्न जमत नसल्याने वकिलाची आईसह आत्महत्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,  मिरज येथील गुरूवार पेठ येथे राहणाऱ्या पुष्पा अग्रवाल यांनी कृष्णा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली तर त्यांचा मुलगा सुनिल सुरेश अग्रवाल यांनी रेल्वेखाली स्वत:ला झोकून देवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुष्पा अग्रवाल यांच्या आत्महत्येची मिरज शहर पोलिसात तर सुनिल अग्रवाल यांच्या आत्महत्येची मिरज रेल्वे पोलिसात नोंद झाली आहे. गुरूवार पेठ … Read more

धक्कादायक! पोलीसांच्या हाप्त्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Untitled design

उल्हासनगर प्रतिनिधी |पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्लासनगर येथे उघडकीस आला आहे. हप्ता मागत असलेल्या पोलीसांचा त्रास सहन होत नसल्याने तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. सतीश खेडकर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो हॉटेल चालक आहे. त्याला पोलीस हप्ता मागून सतत त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने आपले … Read more

मृतदेहांची चित्तर कथा : ३ दिवस मृतदेह दरीतच ;मदत कार्यात प्रशासनाला अपयश

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई , चिखलदरा येथील प्रसिद्ध भीमकुंड पॉइंटच्या दोन हजार फूट खोल दरीत मंगळवारी सकाळी ९.३० वाजता एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी दरीत उतरलेल्या पथकावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला. त्यात एक जण गंभीर, तर पाच किरकोळ जखमी झाले. त्यांना रात्री दीड वाजता दुसऱ्या पथकाने दरीत उतरून बाहेर काढले. … Read more

धक्कादायक ! पती पत्नीने दिला खोल दरीत उडी मारून जीव

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |आशिष गवई , घरगुती वादातून पत्नी तीन आठवड्यांपासून माहेरी गेली, पतीने तिला समजावून दुचाकीवर आणले आणि दोघांनी पर्यटनस्थळावरील प्रसिद्ध असलेल्या भीमकुंड दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, यात एक वर्षाचा चिमुकला मात्र घरी असल्यामुळे बचावला. गणेश झगुजी हेकडे (वय 25), … Read more

‘या’ कारणामुळे आजारी पत्नीचा मृत्यू होताच पतीने केली गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | आजार जडलेल्या पत्नीचा मृत्यू होताच 65 वर्षीय वृद्ध पतीने पत्नीच्या साडीनेच घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडेतीन वाजता मुकुंदवाडीतिल रामनगर भागात घडली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विमलबाई भाऊसाहेब गोसावी वय-60वर्ष, भाऊसाहेब हिरामण गोसावी वय-65वर्ष असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक … Read more

Breaking | बेवफा सनम अलविदा म्हणत तरुणाची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पत्नीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी मारल्याच्या रागातून, परभणी शहरातील गौतम वाव्हळे या 28 वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि 23 एप्रिल रोजी भारतनगर परभणी येथे सकाळी अघडकीस आलीय . मृत्युपूर्वी या तरुणाने ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये, पत्नीला उद्देशुन …सनम बेवफा अलविदा , …आत्महत्या करत असल्याची माहिती दिली … Read more

धक्कादायक! लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी ‘त्याने’ संपविले जीवन

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन  शेख  बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका उच्च शिक्षित तरुणाने आत्महत्या करून जीवन संपविले. हळदीच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. पंचवटीतील हिरावाडी रोडवर रेशीमबंध कार्यालयामागे राहणाऱ्या तरुणाने गंगापूररोडवरील बळवंतनगर भागात आत्महत्या करीत जीवन संपविले. निखिल प्रकाश देशमुख (वय ३० रा. हरिकृपा रो-हाऊस, पंचवटी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव … Read more

धक्कादायक! विवाहीत मुलीसह आई वडीलांची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कराड येथे घडला आहे. यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्ये मागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील विद्यानगर परिसरात गुरूदत्त काॅलनीमध्ये गुरुवारी दुपारी विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये विवाहीतेने विषारी … Read more

‘ या ‘ कारणामुळे प्रेमी युगुलाने केली आत्महत्या

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख  लखमापुर येथील डाळिंब संशोधन केंद्रा जवळील कारगील वस्ती वरील प्रेमी युगलाने निंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.येथील शेतकरी नकुल भामरे हे सकाळी ६वाजता शेतात चक्कर मारण्यासाठी  गेले असता एकांतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेले दोन मृतदेह आढळले त्यांनी पोलीसांना लागलीच खबर दिली. लखमापुर येथील डाळींब संशोधन केंद्रालगत कारगील वस्ती म्हणुन आदिवासी … Read more

धरणात तरंगत होता अनोळखी महिलेचा मृतदेह, आत्महत्या की खून अजून अस्पष्ट

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पेठ तालूक्यातील इनामबारी धरणात शनिवारी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. धरणामध्ये डेड बाॅडी तरंगत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीसांशी सपर्क साधला असता सर्व प्रकार उघड झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील पेठ नाशिक मार्गावर इनामबारी धरणात हॉटेल सह्याद्री पासुन जवळच असलेल्या धरणात अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी ११ … Read more