२० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही – जितेंद्र आव्हाड 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. २० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी हे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकारमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे या विषयावर आव्हाडांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीत कोणत्याच कुरबुरी नाहीत. आम्ही प्रेमानेच वागतो आहोत आणि निर्णय घेत आहोत असेही ते म्हणाले.  विरोधी पक्ष या गोष्टीचे राजकारण करत असल्याचे देखील ते म्हणाले.

https://t.co/G16gIefr4vजर कुणी सीमेत घुसलं नाही , कुठल्या पोस्ट वर ताबा घेतला नाही मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची??— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 20, 2020 https://platform.twitter.com/widgets.js

‘चीन ने शुक्रवारी नवीन दावा केला गलवान व्हँली आमच्याच हद्दीत आहे. भारतीय सैन्याने सीमा रेषा ओलांडली. मोदीजी आपल्या भू भागावर चीन सरळ सरळ हक्क सांगतोय,चायना ला उत्तर द्यावे लागेल. गलवान खोरे आमचे आहे आमचेच राहील.’ असे ट्विट देखील भारत चीन वादासंदर्भात आव्हाड यांनी केले आहे. तसेच “चीन-भारत सीमाभागात काहीच झालं नाही, असं म्हणणं कसं चालेल, सर्व भारतीयांच्या मनात हा प्रश्न आहे. याचं उत्तर लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधानांनी द्यायला हवं. एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका घ्यायला हवी. याबाबत आम्ही सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून पंतप्रधानांच्या सोबत आहोत, पण सत्य समोर यायला हवं,” असे म्हणत आव्हाड यांनी याबाबतीत पंतप्रधानांच्या सोबत असल्याचे सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. असा प्रश्न उपस्थित करत आव्हाड यांनी १९६७ नंतर आजपर्यंत चीनच्या सीमेवर कोणत्याही भारतीय सैनिकाने प्राण गमावलेले नाहीत असेही त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment